कुठेही ‘म्युकरमायकोसिस’वर मोफत उपचार नाहीत, सरकारची घोषणा फसवी;  देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारची ही घोषणा फसवी आहे. राज्यात कुठल्याही रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात नसल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

    मुंबई : राज्यात कोरोना संकटाच्या काळात म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराने विळखा घातल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध भागात म्युकरमायकोसिसमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. म्युकरमायकोसिसवरील उपचाराचा खर्चही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. अशावेळी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जातील अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारची ही घोषणा फसवी आहे. राज्यात कुठल्याही रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात नसल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

    दरम्यान महाविकास आघाडीची घोषणा फसवी असून राज्यात कुठल्याही रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात नाहीत, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच, कोणत्याही रुग्णालयात दाखल असलेल्या म्युकरमायकोसिसचा रुग्णांना मोफत इंजेक्शन्स देण्यात यावीत, अशी मागणी करत देवेंद्र फडणवीस यांनी “सरकारने जनताभिमुख कामे करावीत”, असा सल्लाही यावेळी दिला आहे.

    तसेचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काहीच दिवसांपूर्वी याबाबत जाहीर घोषणा केली होती. राजेश टोपे म्हणाले होते की, “महात्मा फुले जनआरोग्य योजनेद्वारे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपचाराचा सर्व खर्च केला जाईल. तसेच औषधाचा खर्चही या योजनेत समाविष्ट केला जाईल.” मात्र, आता फडणवीसांनी केलेल्या आरोपांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.