अंगारकीला सिद्धीविनायक मंदिरात शुकशुकाट

 राज्यात कोरोनाचे सावट कायम असल्यामुळे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांना २४ तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. कोविड-१९ संसर्ग निर्बंध नियमावलीनुसार गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच श्री सिद्धीविनायकाचं दर्शन घ्यावं, अशी विनंती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केली आहे.

    मुंबई : आज अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने लाखो गणेशभक्त विविध गणपती मंदिरात गर्दी करतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच मंदिरात शुकशुकाट पाहायला मिळाला.
    दरवर्षी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त मुंबईतील दादर परिसरात असलेले प्रसिद्ध सिद्धीविनायक गणपती मंदिरात अनेक भाविकांची गर्दी पाहायला मिळत असे. मात्र कोरोनामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

    राज्यात कोरोनाचे सावट कायम असल्यामुळे अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने गणेशभक्तांना २४ तास ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था केली आहे. कोविड-१९ संसर्ग निर्बंध नियमावलीनुसार गणेशभक्तांनी मंदिरात प्रवेश न करता घरातूनच श्री सिद्धीविनायकाचं दर्शन घ्यावं, अशी विनंती श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केली आहे.

    बाप्पा कोरोना संकट दूर कर, भाविकांची प्रार्थना

    अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर सिद्धीविनायक मंदिराच्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र काही गणेशभक्त पहाटेपासून सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी येत होते. या भक्तांनी गेटबाहेरुनच बाप्पाचे दर्शन घेतले.