वर्षा बंगल्यावर दीड तास खलबतं! सचिन वाझे आणि पोलीस आयुक्तांसंदर्भात निर्णय होणार?

सचिन वाझे अटक प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले. तसेच मागील दीड तास यांच्यामध्ये खलबतं सुरू आहेत.

    मुंबई : मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे अटकेचे महाविकास आघाडी सरकारमध्ये पडसाद उमटले आहे. आज दुसऱ्या दिवशी सुद्धा वर्षा बंगल्यावर बैठका सुरूच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात महत्त्वाची बैठक सुरू आहे.

    सचिन वाझे अटक प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकारने तातडीने डॅमेज कंट्रोल सुरू केले आहे. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले. तसेच मागील दीड तास यांच्यामध्ये खलबतं सुरू आहेत.

    या बैठकीला शिवसेनेचे नेते अनिल परब हे देखील उपस्थितीत होते. तसंच गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. सचिन वाझे प्रकरणाबरोबर पोलीस आयुक्त बदली? राज्यातील कोरोना परिस्थिती आणि जळगाव महापालिका याबाबत ही बैठक होत आहे. त्यामुळे मुख्य म्हणजे सचिन वाझे आणि पोलीस आयुक्तांसंदर्भात काय निर्णय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.