वेेगळं राहूनही आई-वडिलांमध्ये आहे चांगलं बाॅण्डिंग; करीनाने उलघडला नात्यातील गोडवा

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई बनणार आहे. सध्या बेबो बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते. करीनाच्या प्रेग्नेंसी लूकची सगळीकडे चर्चा होताना दिसते. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत करीना कपूरने आपल्या आईबद्दल सांगितले. तिने तिच्या पालकांमधील बॉण्डिंगबद्दल सांगितले. यासोबतच तिने सांगितले की एक सिंगर मदर म्हणून बबिताने तिची आणि करिष्माचे पालन पोषण केले.

मुंबई (Mumbai).  बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई बनणार आहे. सध्या बेबो बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसते. करीनाच्या प्रेग्नेंसी लूकची सगळीकडे चर्चा होताना दिसते. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत करीना कपूरने आपल्या आईबद्दल सांगितले. तिने तिच्या पालकांमधील बॉण्डिंगबद्दल सांगितले. यासोबतच तिने सांगितले की एक सिंगर मदर म्हणून बबिताने तिची आणि करिष्माचे पालन पोषण केले.

करीना कपूर खानने आपल्या संगोपनाबद्दल आणि आई वडिलांच्या बॉण्डिंगबद्दल सांगितले. तिने सांगितले की, हो, माझी आई माझी सर्वात चांगली फ्रेंड आहे पण मी माझ्या वडिलांचादेखील तितकाच आदर करते आणि माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. ते अशा लोकांपैकी एक आहेत जे तुमच्या समोर जास्त भावना व्यक्‍त करत नाहीत.

ते शांतपणे आपली जबाबदारी पार पाडतात. ते नेहमी आमच्यामागे खंबीरपणे उभे राहतात. ते त्या लोकांपैकी नाही ज्यांना नेहमी अटेंशन हवे असते. मला हे चांगलेच माहित आहे. करीनाने पुढे सांगितले की, माझ्या पालकांमध्ये खूप छान नाते आहे. कधी कधी दोन लोकांना हे जाणवते की, त्यांचे लाइफ त्यांना जशी, हवी आहे तशी नाही आहे. त्यावेळी ते एकत्र न राहण्याचा निर्णय घेतात. मात्र, नंतरदेखील ते एकमेकांचे मित्र राहतात. ते नेहमी एकमेकांच्या संपर्कात असतात. विभक्त झाल्यानंतरही आपल्या मुलांबद्दलचा निर्णय एकत्रित घेतात. हे गरजेचे नाही की ते नेहमी आमच्यासोबत राहतील. करीश्मा आणि मला आधीपासूनच समजले होते की, अशाप्रकारचे नाते अस्तित्त्वात आहे. माझे आई वडील गेल्या 35 वर्षांपासून असेच राहत आहेत.