…पण महाराष्ट्रात ऑक्सिजनविना एकही मृत्यू नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपेंचा दावा

दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच राज्याकडे उपलब्ध असणारा साठा मर्यादित होता. दरम्यान, ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू (Death) झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केला आहे.

    मुंबई :  राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं प्रचंड प्रमाणात थैमान घातलं होतं. दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. तसेच राज्याकडे उपलब्ध असणारा साठा मर्यादित होता. दरम्यान, ऑक्सिजनअभावी महाराष्ट्रात एकाही रुग्णाचा मृत्यू (Death) झालेला नाही, असा दावा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केला आहे.

    कोरोनाची दुसरी लाट कळस गाठत असताना राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होईल, अशी परिस्थिती होती. मात्र प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्यामुळे कुठेही ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू झाला नाही, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात ऑक्सिजन मर्यादित असल्यामुळे तो वाया जाणार नाही, याचीदेखील खबरदारी घेतली गेली, असं टोपेंनी सांगितलं आहे.