महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही विसंवाद नाही, काँग्रेसच्या ‘या’ मंत्र्याने दिलं स्पष्टीकरण

काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये विसंवाद असेल, तर चर्चेतून मार्ग निघेल, असेही थोरात म्हणाले. काँग्रेसचे मंत्री लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. काल झालेल्या विसंवादाच्या घटनेनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज खुलासा केला आहे.

    मुंबई : अनेक मुद्यांवरुन महाविकासआघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये विसंवाद असल्याचं अनेकदा समोर आलं आहे. त्याचीच प्रचिती पुन्हा एकदा काल (३ जून) मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकबद्दल केलेल्या घोषणेवरुन आली. यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही विसंवाद नसल्याचा खुलासा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

    काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये विसंवाद असेल, तर चर्चेतून मार्ग निघेल, असेही थोरात म्हणाले. काँग्रेसचे मंत्री लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. काल झालेल्या विसंवादाच्या घटनेनंतर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज खुलासा केला आहे.

    दरम्यान’मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी मुंबईत बैठक झाली. त्यानंतर या खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत अनलॉकचे पाच टप्पे जाहीर करण्याचा निर्णय झाल्याचे सांगताना ‘तत्त्वत:’ हा शब्द विसरले आणि वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्र अनलॉक होत असल्याचे ब्रेकिंग वृत्त झळकवणे सुरू केले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने खुलासा करीत सांगितले की, राज्यातील निर्बंधांच्या बाबतीत पाच टप्पे ठरवण्यात आले.

    ऑक्सिजन बेडवर दाखल रुग्ण आणि साप्‍ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हे अनलॉकचे निकष आहेत. हे निकष प्रशासकीय घटक आणि जिल्हा यंत्रणेकडून तपासून घेण्यात येत आहेत. संपूर्ण आढावा घेऊन या अनलॉकची अंमलबजावणी केली जाईल. या विषयीची सुस्पष्ट माहिती अधिकृत निर्णयाद्वारे कळवली जाईल, असे राज्य शासनाने स्पष्ट केल्याचेही या जनसंपर्क विभागाने म्हटले होते. त्यावरून पाच टप्प्यांत अनलॉक हा निर्णय तूर्त अधिकृत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची अधिकृत घोषणा करतील असं सांगितलं जात आहे.