भाजपा ही मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारी जमात आहे यात शंका नाही!

भाजपा ही मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारी जमात आहे यात शंका नाही!,अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केली आहे.

सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आली होती. या मागणीवरून बरेच वादंगही निर्माण झाले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडं सोपवला होता. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनीच आतापर्यंत कोणतेही हत्या केल्याचे पुरावे सापडले नसल्याचं सांगितल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत भाजपावर टीका केली होती. तसेच, बिहारमधील आगामी निवडणुकीत हा मुद्दा जास्त चर्चेत राहण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीच्या आर्ट कल्चर सेलचे बिहार संयोजक वरुणकुमार सिंह यांनी सुशांतचा फोटो असलेले स्टिकर्स छापले आहेत. या स्टिकर्सवर “ना भूले हैं, ना भूलने देंगे” असे लिहिले आहे. यावरुन आता राजकारण चांगलंच तापलं असून काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे.

तसेच त्यानंतर आता  भाजपा ही मेलेल्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारी जमात आहे यात शंका नाही!,अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केली आहे.

१४ जूनच्या घटनेनंतर आमच्या शिवाय सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी करणी सेनेने सुद्धा लोकांना स्टिकर्स आणि मास्कचे वाटप केले आहे, असेही वरूणकुमार सिंह यांनी सांगितले. वरुणकुमार सिंह यांनी स्टिकर्स जारी केले आहे. या स्टिकर्सवर दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतचा हसरा फोटो आहे. ‘जस्टिस फॉर सुशांत’ असे फोटोच्या वरती लिहिलेले आहे. तर फोटोच्या खाली ‘ना विसरणार, ना विसरू देणार’ असे लिहिले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सुशांतच्या छापलेल्या स्टीकरवरुन सावंत यांनी, भाजपा ही मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात आहे, यात शंका नाही, असे म्हटले आहे.