मंत्रिमंडळात फेरबदलांच्या चर्चेत तथ्य नाही काँग्रेस स्वबळावरच लढणार : राहुल गांधींच्या भेटीनंतर पटोलेंना हायकमांडकडून मोकळीक मिळाल्याचे संकेत!

विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. तीन वर्ष बाकी आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही.

  नवी दिल्ली : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की दरम्यान, राज्यात काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांमध्ये काहीच तथ्य नाही. सध्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही. फेरबदल होणार की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  मात्र महाराष्ट्रात काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा त्यांनी पुनरूच्चार केला. राहुल गांधींच्या भेटीनंतरही पटोले यांच्या स्वबळाच्या भाषेने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या गेल्या काही दिवसांतील नाराजीबाबत नाना पटोले यांच्या खुलाशावर हायकमांड समाधानी असल्याचे मानले जात आहे.

  निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार

  यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. तीन वर्ष बाकी आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही.

  पक्ष कसा वाढवायचा त्यावर सखोल चर्चा

  पटोले म्हणाले की, आज राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली. यावेळी केसी वेणुगोपलही उपस्थित होते. महाराष्ट्रात आज इतर पक्षांची जी स्थिती आहे त्यात मुळचे काँग्रेसचे कार्यकर्ता नेता आहेत. त्यामुळे काँग्रेसला नव्याने नियोजनबद्ध पक्ष कसा वाढवायचा त्यावर सखोल चर्चा या बैठकीत झाली, असेही ते म्हणाले.

  माझ्या फोन टँपिंगची चौकशी सुरू

  २०१६-१७मध्ये फडणवीस सरकारमध्ये माझे फोन टॅप झाले होते. सत्ताधारी आणि विरोधकांचेही फोन टॅप झाले होते. त्याबाबत मी विधानसभेत आवाज उठवला होता. त्याची चौकशी सुरू आहे, असे त्यांनी पेगासीस बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांची नुकतीच भेट घेतली त्यावर, बोलताना पटोले म्हणाले की, ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत गोष्ट आहे. त्यांनी कुणाला भेटाचे किंवा भेटू नये हा त्यांचा निर्णय आहे. सध्या मोदी सर्व जनतेची हेरगिरी करत आहे. लोकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याला धोका पोचवण्याचे काम मोदी आणि भाजप करत आहे. काँग्रेस हेरगिरी करत नाही, असे त्यांनी सांगितले.

  There is no fact in the discussion of cabinet reshuffle Congress will fight on its own