Coastal road work is also underway in the Corona crisis; The project will be completed by 2023

या यंत्रणे अंतर्गत प्रत्येकी २ मीटर व्यासाच्या वैशिष्ट्यपूर्ण पंख्यांचा समावेश असून प्रत्येक बोगद्यासाठी ३ यानुसार दोन्ही बोगद्यांसाठी एकूण ६ पंखे असणार आहेत. यासाठी बोगद्यांच्या आतमध्ये तसेच बोगद्यांच्या वरती देखील वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम करुन तिथे 'सकार्डो नोझल' यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेचा उपयोग प्रामुख्याने बोगद्यांमधील हवा खेळती राहण्यासाठी होणार आहे. तसेच बोगद्यांमधून जात असलेल्या वाहनातून बाहेर पडणारा धूर बोगद्याच्या बाहेर ढकलण्यासही या यंत्रणेची मदत होणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली.

    मुंबई : काेस्टल राेडच्या मार्गात प्रत्येकी २.०७ किलोमीटर लांबीचे दोन महाबोगदे आहेत. बोगद्यांमधील हवा खेळती रहावी, यासाठी या दोन्ही बोगद्यांमध्ये ‘सकार्डो नोझल’ ही अत्याधुनिक यंत्रणा बसविली जाणार असून या बाेगद्यात आगीचा आणि प्रदुषणाचा धाेका नाही असा दावा पालिकेने केला आहे. विशेष म्हणजे रस्ते वाहतूक बोगद्यांमध्ये देशात पहिल्यांदाच अशी यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

    या यंत्रणे अंतर्गत प्रत्येकी २ मीटर व्यासाच्या वैशिष्ट्यपूर्ण पंख्यांचा समावेश असून प्रत्येक बोगद्यासाठी ३ यानुसार दोन्ही बोगद्यांसाठी एकूण ६ पंखे असणार आहेत. यासाठी बोगद्यांच्या आतमध्ये तसेच बोगद्यांच्या वरती देखील वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम करुन तिथे ‘सकार्डो नोझल’ यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या यंत्रणेचा उपयोग प्रामुख्याने बोगद्यांमधील हवा खेळती राहण्यासाठी होणार आहे. तसेच बोगद्यांमधून जात असलेल्या वाहनातून बाहेर पडणारा धूर बोगद्याच्या बाहेर ढकलण्यासही या यंत्रणेची मदत होणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली.

    ‘सकार्डो नोझल’ या यंत्रणे अंतर्गत दोन्ही बोगद्यांच्या मुखांजवळ पंख्यांशी जोडलेली वैशिष्ट्यपूर्ण यंत्रणा बसविली जाईल. तर या यंत्रणेमध्ये पंखे असलेला भाग बोगद्यांच्यावर एक इमारत बांधून त्यामध्ये बसविला जाणार आहे. यामध्ये असणारे पंखे हे प्रति मिनिट १८०० ‘राऊंड’ या उच्च वेगाने गोल फिरणारे असतील. प्रत्येक बोगद्यासाठी ३ याप्रमाणे दोन्ही बोगद्यांसाठी ६ पंखे असणार आहेत. एकावेळी एका बोगद्यातील २ पंखे सुरु राहणार असून, तीनही पंखे हे क्रमशः पद्धतीने कार्यरत राहतील. सकार्डो नोझल या यंत्रणेचे आयुर्मान हे ५० वर्ष अशी माहिती मराठे यांनी दिली.

    यंत्रणेद्वारे बोगद्याच्या एका बाजूने हवा अत्यंत तीव्रतेने आतमध्ये ढकलली जाईल व बोगद्याच्या दुस-या बाजूने ती बाहेर ढकलली जाईल. बोगद्याची वाहतूक ज्या दिशेने जात असेल, त्याच दिशेने ही हवा खेळती राहील, याची काळजी या यंत्रणेद्वारे घेतली जाणार आहे. वाहनांमधून सोडला जाणार धूर देखील बोगद्यातून लगेच बाहेर पडेल व प्रदूषण उत्सर्जित होऊन बोगद्यातील वातावरण चांगले राहण्यास मदत होईल.

    एखाद्या दुर्दैवी प्रसंगी गाडीला आग लागल्यास त्यातून उत्पन्न होणारा धूर देखील या यंत्रणेद्वारे वेगाने बाहेरच्या दिशेने ढकलला जाईल. ज्यामुळे धूर बोगद्यात साठणार नाही व आपत्कालिन परिस्थितीचे नियोजन करणे सुलभ होईल. हे लक्षात घेता, ही सकार्डो नोझल यंत्रणा अग्निशमन यंत्रणेस व आपत्कालिन व्यवस्थापन यंत्रणेस पूरक ठरेल, अशीही माहिती प्रमुख अभियंता मराठे यांनी दिली आहे.