जादूटोण्यावरून मारहाणीत हिंदू-दलित वाद नाही; मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा खुलासा

चंद्रपूर येथे झालेल्या सामूहिक मारहाणीबद्दलही भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकांचे जीव असुरक्षित असून सुरक्षा केवळ नेत्यांच्या मुलांची वाढली आहे. महिलावर, बालकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पोलिसांवर सरकारचा वचक नाही.

    मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील सात जणांना अमानूष मारहाण करण्यात आली. या संपूर्ण प्रकारावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला. अत्यंत अमानुष, माणुसकीला काळिमा फासणारी आणि समाजमन हेलावणारी ही घटना आहे. या घटनेमागे हिंदू-दलित वाद नाही. 13 जणांना अटक केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

    चंद्रपूर येथे झालेल्या सामूहिक मारहाणीबद्दलही भाजपा आमदार आशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकांचे जीव असुरक्षित असून सुरक्षा केवळ नेत्यांच्या मुलांची वाढली आहे. महिलावर, बालकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पोलिसांवर सरकारचा वचक नाही. पोलिसांच्या आपापसातील गटबाजीमुळे ते आतून पोखरून गेले आहेत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घ्यावा, अशी सूचनाही शेलार यांनी केली.

    कोणत्याही माणसाला मारताना आपण कोणत्या युगात आहोत याचा विचार करावा. जादूटोणाच्या काल्पनिक गोष्टी पाहून मारहाण करणे निषेधार्ह आहे. महिला आणि वृद्धांना मारहाण करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करा, असे आदेश दिले आहे. अशिक्षितपणा अजून कायम आहे. अनेकांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतली, ही खेदाची बाब आहे. तरुणांनी पुढे येऊन हा प्रकार थांबवायला हवा होता. झालेला प्रकार निषेधार्ह आहे.

    - विजय वडेट्टीवार, कॅबिनेट मंत्री

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]