राज्यात यापुढे लॉकडाऊन नाही, लवकरच सुरु होणार लोकल आणि जीम.. राजेश टोपेंची मोठी घोषणा

राज्यात येत्या नोव्हेंबरपर्यंत सर्व काही अनलॉक केले जाणार आहे. राज्यात पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करूया, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.

मुंबई : करोनाचा (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन (Unlock)करण्यात आले. परंतु, आता अर्थचक्र सुरू करण्यासाठी आता अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अशातच राज्य नोव्हेंबरपर्यंत अनलॉक होईल, असे स्पष्ट संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. ते अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यात येत्या नोव्हेंबरपर्यंत सर्व काही अनलॉक केले जाणार आहे. राज्यात पुढील काही दिवसात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करूया, असे राजेश टोपे म्हणाले आहेत.

करोनावर अद्यापही लस आलेली नसल्यामुळे आता आपल्याला करोनासोबत राहावे लागणार आहे. त्यामुळे आपल्याला काही नियम अटींसह शिस्त पाळली पाहिजे, असेही राजेश टोपेंनी स्पष्ट केले.

करोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. या औषधाचा सर्रास वापर न करता डॉक्टरांनी जपून आणि ज्यांना आवश्यकता आहे. अशा गंभीर रुग्णांसाठी ते वापरावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले. RTPCR टेस्टचा रेट ८०० रुपयांपर्यंत आणल्याची माहिती देखील टोपे यांनी दिली.

‘मास्क N 95 हा बाजारात १५० ते २०० रुपयाला मिळतो परंतु, त्याची बनविण्याची किंमत १२ रुपये इतकी आहे. एमआरपी नुसार तो १९ रुपयांपर्यंत विकला पाहिजे’, असे असताना पुरोगामी महाराष्ट्रात सारख्या पुरोगामी राज्याला हे बिल्कुल मान्य नाही. त्यामुळे आता त्यासाठी समिती स्थापन करून अशा विक्रेत्यांना दिशा, आणि निर्देश दिल्याचे देखील टोपे यांनी यावेळी सांगितले.