There is no police watch on Sameer Wankhede; Home Minister Dilip Walse Patil denied the allegations

अंमली पदार्थ नियामक कक्षाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांनी आपल्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार पोलिस महासंचालकांकडे केली आहे. वानखेडे यांच्या या तक्रारीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र, वानखेडे यांचे हे आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Home Minister Dilip Walse Patil) यांनी फेटाळून लावले आहेत. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश दिलेले नाहीत, अशी कुणावर काही पाळत ठेवली जात नाही, असे गृहमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

    मुंबई : अंमली पदार्थ नियामक कक्षाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांनी आपल्यावर पोलिसांकडून पाळत ठेवली जात असल्याची तक्रार पोलिस महासंचालकांकडे केली आहे. वानखेडे यांच्या या तक्रारीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मात्र, वानखेडे यांचे हे आरोप गृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Home Minister Dilip Walse Patil) यांनी फेटाळून लावले आहेत. वानखेडे यांच्यावर पाळत ठेवण्याचे कुठलेही आदेश दिलेले नाहीत, अशी कुणावर काही पाळत ठेवली जात नाही, असे गृहमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

    समीर वानखेडे यांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे एनसीबीच्या विभागीय संचालकपदी वानखेडे पुढील सहा महिने कायम राहतील. वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.

    तक्रारदारावरच पोलिसांनी गुन्हे दाखल करायचे. अनिल देशमुख प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्याला पोलिसांकडूनच धमक्या, पोलिस माजी गृहमंत्री, माजी आयुक्तांच्या अजूनही मागावरच, आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पोलिसांकडून पाठलाग... महाराष्ट्रात काय पोलिस-पोलिस खेळ सुरु आहे का?

    - आशीष शेलार, भाजपा