मुंबईत तिसऱ्या लाटेची शक्यता नाही; ट्रिपल म्युटंट नसल्याचे नमुन्यातून स्पष्ट, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती बाळगू नये असे पालिका अधिकाऱ्यांचे आश्वासन

वरिष्ठ तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ही तिसरी लाट असून कोरोनाचा विषाणू भयानक आहे. त्याचा फैलाव वेगाने होत असून त्यामुळेच रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या डबल म्युटंट ट्रिपल होऊन वेगाने पसरत असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

    मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अधिक प्रभावी असून त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच परदेशी डॉक्टरांनी तिसऱ्या लाटेचा अंदाजानुसार ती अधिक नुकसान देणारी ठरणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. दरम्यान मुंबईत रुग्ण संख्या मोठी असली तरी मुंबईत तिसऱ्या लाटेची शक्यता मुंबई महानगर पालिकेकडून फेटाळण्यात आली आहे.

    वरिष्ठ तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ही तिसरी लाट असून कोरोनाचा विषाणू भयानक आहे. त्याचा फैलाव वेगाने होत असून त्यामुळेच रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या डबल म्युटंट ट्रिपल होऊन वेगाने पसरत असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.

    यावर बोलताना पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या की, प्रत्येक आठवड्यात एनआयव्हीला ७० नमुने पाठवले जातात. त्यामुळे नवीन व्हायरस बदलला की नाही याची माहीत मिळते. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता त्यांनी फेटाळून लावली. शिवाय एनआयव्हीला पाठविण्यात आलेल्या नमुन्यात ट्रीपल वेरियंट आढळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती बाळगू नये असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे.

    दरम्यान, दुसर्‍या किंवा तिसऱ्या म्युटंटसाठीचे नमुने कस्तुरबा रुग्णालयातून पाठवण्यात आले आहेत व एनआयव्हीप्रयोगशाळेत ते रिपोर्ट पाठवले असून त्याचा अहवाल आल्यानंतरच याविषयी सांगितले जाईल असे पालिका रुग्णालयाचे संचालक डाॅ. रमेश भारमल यांनी सांगितले.