संभाजीराजेंच्या हेरगिरीचा प्रश्नच नाही, संशय दूर केला… गृहमंत्र्यांच्या ट्वीटनंतर प्रश्नावर पडदा टाकल्याचा संभाजीराजेंचं ट्वीट

राज्यभर करत असलेल्या दौऱ्यां दरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता. यासंदर्भात माझी संभाजी राजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे’, असे ट्वीटमध्ये गृहमंत्री वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

    मुंबई : मराठा आरक्षणच्या मुद्यावर सरकारशी दोन हात करण्याच्या खासदार संभाजीराजेंच्या भुमिकेनंतर त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा किवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर केल्याची माहिती गृहमंत्री वळसे पाटील यांनी व्टिट करत दिली आहे, त्यानंतर या विषयावर गैरसमज दूर झाल्याचा ट्वीट करत संभाजीराजे यानी देखील प्रश्नावर पडदा टाकल्याचे म्हटले आहे.

    पाळत नव्हे पुरेसा बंदोबस्त

    काल आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचे ट्वीट संभाजीराजे यांनी केले त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी  राजेंना तातडीने फोन केला. त्यांनी खुलासा केला की ‘छत्रपती संभाजी राजेंवर पाळत ठेवण्याचा किंवा हेरगिरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते राज्यभर करत असलेल्या दौऱ्यां दरम्यान कोणतीही सामाजिक अपप्रवृत्ती त्यांच्या कार्यक्रमात विघ्न आणू नये म्हणून पुरेसा बंदोबस्त सिंधुदुर्ग दौऱ्यात नेमण्यात आला होता. यासंदर्भात माझी संभाजी राजेंशी चर्चा झालेली आहे आणि त्यांचा गैरसमज पूर्णपणे दूर झालेला आहे’, असे ट्वीटमध्ये गृहमंत्री वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

    चेंबर मध्ये येण्याची चूक झाली

    दरम्यान संभाजीराजे यांनीच ट्वीट करत माहिती दिली आहे. “आताच गृह मंत्र्यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितले, खालच्या कर्मचाऱ्यांची बैठकीचे ठिकाणी आत जिल्हाधिकारी चेंबर मध्ये येण्याची चूक झाली. परंतु त्यांचा उद्देश हेरगिरीचा नव्हता. माझ्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी तसे केले असावे. मी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर समाधानी असून. हा विषय संपला आहे”, असे संभाजीराजे यांनी ट्वीट मध्ये म्हटले आहे.