निवासी डाॅक्टरांच्या संपावर ताेडगा नाहीच; संप अधिक तीव्र करण्याचा मार्ड संघटनेचा निर्णय

राज्यभरातील निवासी डाॅक्टरांनी १ऑक्टाेबरपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. रविवारी संपाचा तिसरा दिवस असूनही रात्री उशीरापर्यंत वैद्यकीय शिक्षण व संशाेधन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवासी डाॅक्टरांबराेबर काेणतीही चर्चा केली नाही. राज्य सरकारच्या या उदासीन भूमिकेमुळे राज्यभरातील निवासी डाॅक्टरांमध्ये नाराजी पसरली अाहे. ज्यामुळे रविवारी सेंट्रल मार्डच्या झालेल्या बैठकीत साेमवारी दुपारी साडे तीन पासून संप अधिक तीव्र करण्याचा निर्णय मार्ड संघटनेने घेतला असल्याचे महाराष्ट्र निवासी डाॅक्टर्स राज्यव्यापी संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर ढाेबळे-पाटील यांनी सांगितले.

  मुंबई: राज्यभरातील निवासी डाॅक्टरांनी १ऑक्टाेबरपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. रविवारी संपाचा तिसरा दिवस असूनही रात्री उशीरापर्यंत वैद्यकीय शिक्षण व संशाेधन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवासी डाॅक्टरांबराेबर काेणतीही चर्चा केली नाही. राज्य सरकारच्या या उदासीन भूमिकेमुळे राज्यभरातील निवासी डाॅक्टरांमध्ये नाराजी पसरली अाहे. ज्यामुळे रविवारी सेंट्रल मार्डच्या झालेल्या बैठकीत साेमवारी दुपारी साडे तीन पासून संप अधिक तीव्र करण्याचा निर्णय मार्ड संघटनेने घेतला असल्याचे महाराष्ट्र निवासी डाॅक्टर्स राज्यव्यापी संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर ढाेबळे-पाटील यांनी सांगितले.

  वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे दिलेले आश्वासनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ‘मार्ड’ संघटनेने शुक्रवारपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाची सुरुवात ओपीडीपासून करण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून केईएम, नायर, सायन आणि जे.जे. रुग्णालयासह राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. या संपामध्ये राज्यातील ५५०० मार्डचे डॉक्टर सहभागी झाले आहेत. सर्व अतिदक्षता विभागातील सेवा सुरु राहणार आहेत. तसेच काेविड अतिदक्षता विभागही सुरु राहणार आहे.

  साेमवारी दुपारनंतर पुढील सेवा निवासी डाॅक्टरांकडून बंद राहणार

  •  सर्व बाह्यरुग्ण विभाग (सर्व ओपीडी)
  • सर्व स्थिर रुग्ण असणाऱ्या कक्षातील कार्य
  • स्थिर रुग्णासंबंधित सर्व तपासण्या
  • अपघात विभाग
  • अपघात विभागातील रुग्णांच्या तपासण्या
  • अत्यावश्यक शस्त्रक्रिया व प्रसूतीगृह
  • सर्व लसीकरण विभाग

   डाॅक्टरांच्या मागण्या

  •  कोरोना काळातील शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे दिलेले आश्वासनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष प्रमुख मागणी
  • काेराेना काळात डाॅक्टरांच्या अाराेग्याकडे दुर्लक्ष
  • निवासी डाॅक्टरांच्या राहण्याची वसतिगृहांची दुरावस्था
  • या संपामध्ये राज्यातील ५५०० मार्डचे डॉक्टर सहभाग