मुंबईतील २० विभागात एकही झोपडपट्टी सील नाही ; कोरोनाचा प्रसार आटोक्यात

मुंबई महापालिकेची २४ विभाग कार्यालयांपैकी २० विभागात एकही झोपडपट्टी किंवा चाळ सील नाही. अंधेरी येथील के,पूर्व मध्ये ४, भांडुप येथील एस, कांदिवली येथील आर, दक्षिण तसेच मानखुर्द गोवंडी येथील एम, पूर्व विभागात प्रत्येकी दोन झोपडपट्टया आणि चाळी सील करण्यात आल्या आहेत.

    मुंबई – मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार आटोक्यात येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने मुंबईमधील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यामुळे कंटेनमेंट झोन, सील इमारतींची संख्या देखील कमी होत आहे. मुंबई महापालिकेच्या २४ विभागापैकी २० विभागात एकही झोपडपट्टी सील नाही.तसेच ९ विभागात एकही इमारत सील नसल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

    मुंबई महापालिकेची २४ विभाग कार्यालयांपैकी २० विभागात एकही झोपडपट्टी किंवा चाळ सील नाही. अंधेरी येथील के,पूर्व मध्ये ४, भांडुप येथील एस, कांदिवली येथील आर, दक्षिण तसेच मानखुर्द गोवंडी येथील एम, पूर्व विभागात प्रत्येकी दोन झोपडपट्टया आणि चाळी सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत १० चाळी कंटेनमेंट झोन आहेत. त्यात १३ हजार घरे असून त्यात ५७ हजार नागरिक राहतआहेत. दरम्यान, महापालिकेच्या २४ पैकी ९ विभागात एकही इमारत सील नाही.

    मुलुंडच्या टी,कांदिवली येथील, आर,दक्षिण,बोरिवली येथील आर,मध्य, कुर्ला येथील एल, अंधेरी पूर्व येथील के,पूर्व, बांद्रा येथील, एच पश्चिम खार येथील एचपूर्व, एल्फिस्टन येथील जी दक्षिण तसेच फोर्ट कुलाबा येथील ए या विभागात एकही इमारत सील नाही. दहिसर येथील आर,उत्तर, गोरेगाव येथील पी, दक्षिण, घाटकोपर येथील एन, दादर येथील जी नॉर्थ, मारिन लाईन्स येथील सी तसेच सँडहर्स्ट रोड येथील बी वॉर्डमध्ये प्रत्येकी एक इमारत सील आहे.

    सर्वाधिक ३४ इमारती या अंधेरी पश्चिम येथील के,पश्चिम विभागात सील आहेत. मुंबईत सध्या ७९ इमारती सील असून त्यात ५ हजार घरे आहेत. त्यात १९ हजार नागरिक राहत आहेत.