मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख
मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख

लव्ह जिहाद कुठे झालाय हे आम्ही दाखवून देऊ. पण, लग्न हा मुलगा-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. मात्र, भाजप यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे, असे किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी सांगितले. लव्ह जहाद सारख्या फालतू मुद्याला महाराष्ट्रात थारा नाही. अशा कायद्याची गरज नाही असे अस्लम शेख (aslam shaikh) म्हणाले.

मुंबई :  उत्तर आणि मध्यप्रदेशात “लव्ह जिहाद”(love jihad) विरोधात कडक कायदा आणण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजप आता या मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकारला उचकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. लव्ह जिहाद वरून महाराष्ट्रातही वातावरण तापवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आघाडी सरकारच्या नेत्यांनी भाजप नेत्यांवर केला आहे.

लव्ह जहादचा मुद्दा उकरून काढत भाजपने आघाडी सरकारमधील शिवसेनेला उचकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी याला चोख प्रत्यत्तर देत हा भाजपचाच अजेंडा असल्याचे म्हटले आहे.

लव्ह जिहाद हा भाजपचा अजेंडा असून, यावरुन केवळ शब्दांचा खेळ सुरु आहे. यावरुन फक्त राजकारण करण्याचा घाट भाजपने घातला असल्याची टीका  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर  यांनी  केली. तर, आपला देश हा धर्माच्याआधारे नव्हे तर संविधानानुसार चालतो, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी म्हटले आहे.

लव्ह जिहाद कुठे झालाय हे आम्ही दाखवून देऊ. पण, लग्न हा मुलगा-मुलीच्या पसंतीचा विषय आहे. मात्र, भाजप यावरून केवळ राजकारण करू पाहत आहे, असे किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी सांगितले. तत्पूर्वी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लव्ह जिहादवरून भाजपकडून सुरु असलेल्या राजकारणावर टीका केली होती.

कोणी कोणाशी लग्न करायचे  हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. आपला देश हा धर्माच्याआधारे नव्हे तर संविधानानुसार चालतो असे अस्लम शेख यांनी म्हटले. लोकांना नोकऱ्या कशा मिळणार? महिलांना संरक्षण कसे मिळणार? कोरोनाच्या संकाटातून सावरायचे कसे? हे  सध्या महत्वाचे असल्याचे अस्लम शेख म्हणाले.

लव्ह जहाद सारख्या फालतू मुद्याला महाराष्ट्रात थारा नाही. अशा कायद्याची गरज नाही असेही शेख म्हणाले.

अस्लम शेख यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला. अस्लम शेख यांनी याकूब मेननच्या फाशीला विरोध केला होता. थोड्या दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही त्यांचीच भाषा बोलू लागतील. मात्र, आम्ही महाराष्ट्रात लव जिहाद होऊ देणार नाही. युपी सरकारने लव्ह जिहादवर कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे, त्यांचे आम्ही समर्थन करतो. यूपीसारखा कायदा महाराष्ट्रात लागू करावा यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव मांडू, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. तर, आता महिलेवर अन्याय करने तीचा जीव घेणे याचे समर्थन शिसेना करत आहे काय?  आता शिवसेनेचे हिंदुत्व कुठे गेले ? बाळासाहेब ठाकरेंची भूमिका विसरले का? असा सवाल भाजपचे आमदार राम कदम यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’वरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.