डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एकही रुग्ण मुंबईत आढळून आलेला नाही. एमएमआर क्षेत्रात कोरोनाचा डेल्टा या नव्या स्ट्रेनचा प्रसार होत असल्याचे म्हटले जाते आहे, मात्र ते सिध्द झालेले नाही. याचे निरीक्षण अद्याप व्हायचे आहे. खबरदारी म्हणून मुंबईतील रोज ५० नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत. मात्र आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

    मुंबई : डेल्टा प्लस व्हेरिएंटचा एकही रुग्ण मुंबईत आढळून आलेला नाही. एमएमआर क्षेत्रात कोरोनाचा डेल्टा या नव्या स्ट्रेनचा प्रसार होत असल्याचे म्हटले जाते आहे, मात्र ते सिध्द झालेले नाही. याचे निरीक्षण अद्याप व्हायचे आहे. खबरदारी म्हणून मुंबईतील रोज ५० नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत. मात्र आतापर्यंत एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

    कोरोनाच्या दुस-या लाटेवर नियंत्रण आले असले तरी धोका कायम आहे. तज्ज्ञांकडून तिस-या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका सज्ज आहे. एमएमआर क्षेत्रात डेल्टा प्लस व्हेरिएंट या नवीन स्ट्रेनचे रुग्ण आढळले असल्याचे म्हटले जात असले तरी अद्याप त्याबाबत स्पष्ट झालेले नाही.

    खबरदारी म्हणून मुंबईतील रोज ५० रुग्णांचे नमुने पुण्याच्या प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत. मात्र या अहवालात डेल्टा प्लस या नवीन स्ट्रेनचा रुग्ण सापडेला नाही. त्यामुळे काळजी करू नये. कोरोनाची लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात तपासणी करून घ्यावी असे आवाहन काकाणी यांनी केले आहे.