आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याचा कॉल आला आणि… मुंबईत खळबळ

मुंबई – मुंबईतील (Mumbai) आमदार निवास (MLA  residence ) बॉम्बने (Bomb) उडवून देण्याचा कॉल आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल सोमवारी (Monday)  रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. तसेच आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याचा कॉल आल्याने येथील परिसरात एकच खळबळ उडाली. श्वानपथक, बॉम्ब स्क्वाड आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तात्काळ आमदार निवास रिकामे केले. बॉम्ब शोधक पथकाने रात्रभर प्रत्येक मजल्यावरील रूम चेक केल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून आमदार निवासापासून ५० मीटरपर्यंत बॅरिकेट लावण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रभर शोधाशोध केल्यानंतर कोणताही बॉम्ब सदृश्य वस्तू हाती लागली नसल्याने हा निव्वळ कुणीतरी खोडसाळपणा केला असावा, अशी शक्यता वर्तवली आहे. पावणेबाराच्या सुमाराला मुंबईत बॉम्बच्या फोनमुळे यंत्रणांची पळापळ झाली. पण तपासाअंती ही अफवाच असल्याचे उघड झाले.