कोरोना काळात मालमत्ता करात वाढ नाही; महापौरांचे स्पष्टीकरण

मुंबईकर करदात्यांवर मालमत्ता कर वाढीची टांगती तलवार आहे. २०२१ च्या रेडिरेकनर दरानुसार सुधारीत कर लागू करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर ठेवला आहे. मालमत्ता करात १४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र कोरानाचा काळ आहे. सर्वांचीच अर्थिकस्थिती नाजूक आहे. कोरोना काळात मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढ करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

  मुंबई : मुंबईकर करदात्यांवर मालमत्ता कर वाढीची टांगती तलवार आहे. २०२१ च्या रेडिरेकनर दरानुसार सुधारीत कर लागू करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर ठेवला आहे. मालमत्ता करात १४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र कोरानाचा काळ आहे. सर्वांचीच अर्थिकस्थिती नाजूक आहे. कोरोना काळात मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढ करणार नाही अशी स्पष्ट भूमिका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.

  मालमात्ता करात दर पाच वर्षांनी सुधारणा करण्याची महापालिका कायद्यात तरतूद आहे. त्यानुसार २०२० मध्ये ही सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे राज्य सरकारने या वाढीला स्थगिती दिली होती. तसेच, मालमत्ता कर आकारणीबाबत सर्वोच्च न्यायालयात वाद प्रलंबित आहे. त्यामुळे महानगर पालिकेने थेट मालमत्ता कराच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मालमत्ता कर हा रेडिरेकनरच्या दरावर अवलंबून असल्याने २०२१ मध्ये राज्य सरकारने निश्चित केलेल्या रेडिरेकनरच्या दरानुसार मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु प्रशासनाने असा निर्णय घेतला असला तरी लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घेणे गरजेचे आहे.

  कोरोनाने मुंबईकरांचे कंबरडे मोडले असतांना अशी कर वाढ करून त्यांना आणखी त्रास दिला जाणार नाही असे महापौर पेडणेकर यांनी सांगितले. आता पालिका निवडणूका आल्या आहेत. त्यामुळे अशी करवाढ केली तर मुंबईकर नाराज होतील आणि त्याचा निवडणूकीवर परिणाम जाणवेल म्हणून आपण करवाढ करणार नाही अशी तुम्ही भूमिका घेतली आहे काय? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की , कोरानाचे संकट अजून संपलेले नाही.आपण कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे पाहत आहोत. मग अशा वेळेस मुंबईकरांच्या पाठिशी उभे राहायला हवे.मात्र करवाढ केली असती तरी तुम्ही का केली? असेही त्या म्हणाल्या.

  मनसेला दुसरे कामच नाही

  नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार होत असून त्यात सत्ताधारी आणि ठेकेदार यांचे साटेलोटे आहे. असा आरोप मनसेचे नेते आणि सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी केला होता.यासंदर्भात पेडणेकर म्हणाल्या की, मनसेला आरोप करण्याशिवाय दुसरे कामच नाही, असे म्हणत त्यांनी मनसेचे नेते संदिप देशपांडे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. नालेसफाईचा तो व्हिडीओ मला देखील आला असून तो मी अतिरिकत पालिका आयुकत पी.वेलारासू यांना पाठविला आहे.ते त्या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहतील आणि त्यात तथ्य असेलतर संबधितांवर कारवाई करू असे महापौर म्हणाल्या.

  हे सुद्धा वाचा