Sachin Waze case:स्फोटकांची गाडी ठेवण्याचा कट रचला दोन महिन्यापूर्वीच; धक्कादायक माहिती आली समोर

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. यात बुकी नरेश धारे आणि निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे. विनायक शिंदे हा माजी पोलीस अधिकारी आहे. विनायक शिंदे हा वारंवार सचिन वाझे यांना भेटायला यायचा. जानेवारी महिन्यात मुंबई पोलीस आयुक्तालयातच स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा कट शिजला होता.

    मुंबई: मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटके भरलेली कार, त्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक आणि त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यानंतर आता मायकल रोडवर स्फोटकांनी गाडी ठेवण्याचा कट हा जानेवारी महिन्यात मुंबई पोलीस आयुक्तालयातच शिजला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने दोन जणांना अटक केली आहे. यात बुकी नरेश धारे आणि निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे. विनायक शिंदे हा माजी पोलीस अधिकारी आहे. विनायक शिंदे हा वारंवार सचिन वाझे यांना भेटायला यायचा. जानेवारी महिन्यात मुंबई पोलीस आयुक्तालयातच स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याचा कट शिजला होता.

    मे २०२० मध्ये विनायक शिंदे हा पॅरोलवर बाहेर आला होता. तब्बल वर्षभर विनायक शिंदे हा पॅरोलवर बाहेरच होता. फेब्रुवारी २०२१ मध्ये विनायक शिंदे मुंबई पोलीस आयुक्तालयात आला होता. सचिन वाझे यांची त्याने भेट घेतली होती. दोघांमध्ये दोन तास बैठक चालली होती. तसंच सचिन वाझेच्या CIU कार्यालयात सुद्धा विनायक शिंदे भेटायचा. विनायक शिंदेने सचिन वाझेच्या केबिन बाहेरील पोलिसांकडून पोलीस लोगोचे मास्क आणि पोलीस लिहलेली निळी पट्टी मागितली होती.

    सचिन वाझेनंतर विनायकने मुंबई पोलीस आयुक्तालयातील एका मोठ्या अधिकाऱ्याची देखील भेट घेतली होती. तो वरीष्ठ अधिकारी कोण आहे? हे अद्याप समोर येऊ शकले नाही. तसंच, विनायक शिंदे आणि सचिन वाझेची ठाण्यातही भेट झाली होती. या कटामध्ये इतरही पोलीस अधिकाऱ्यांचा या कटात सहभाग आहे. त्यामुळे पोलीस दलात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे.

    विनायक शिंदे हा लख्खन भैय्या बनावट चकमक प्रकरणातील आरोपी आहे. विनायक शिंदे लख्खन भैया बनावट चकमकीतील मुख्य आरोपी प्रदिप सुर्यवंशी याचा खास होता. बनावट चकमक प्रकरणी विनायक शिंदे याला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा दिली आहे. प्रदिप सुर्यवंशी, विनायक शिंदे हे सचिन वाझे याचे एकदम खास आहेत. सचिन वाझे याने प्रदीप सुर्यवंशी आणि विनायक शिंदे यांच्या सोबत अंधेरी CIU युनिट मध्ये एकत्र काम केलंय. तावडे नावाने मनसुख हिरेन यांन फोन करणारा विनायक शिंदे असल्याचे बोलले जात आहे यांच्यासोबत आणखी ४ जण होते. सचिन वाझे याच्या सांगण्यावरून विनायक शिंदे याने एक बुकी आणि इतर आरोपींची जुळवाजुळव केल्याचा ATS ला संशय