There will be no criticism of Mumbai Police; Testimony of Hemant Nagarale as the new Commissioner of Police

आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यांनतर नगराळे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. सर्व प्रकरणांचा तपास योग्य पद्धतीने रीतसर तपास NIA किंवा ATS कडून करण्यात येत आहे. तो तपास योग्य रितीने होईल, याची खात्री आहे. जे कोणी दोषी, सहभागी असेल, त्या सर्वांवर कारवाई होईल, असंही नगराळे स्पष्ट केले.

    मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातील निलंबित एपीआय सचिन वाझे अटकेनंतर पोलीस प्रशासनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित राहिले होते. त्यानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाली असून, त्यांच्या जागी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांवर कोणतीही टीका होणार नाही अशी ग्वाही नवे पोलीस आयुक्त म्हणून हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

    आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यांनतर नगराळे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. सर्व प्रकरणांचा तपास योग्य पद्धतीने रीतसर तपास NIA किंवा ATS कडून करण्यात येत आहे. तो तपास योग्य रितीने होईल, याची खात्री आहे. जे कोणी दोषी, सहभागी असेल, त्या सर्वांवर कारवाई होईल, असंही नगराळे स्पष्ट केले.

    महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे मी हा कार्यभार स्वीकारला आहे. येणाऱ्या दिवसात जी मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे, त्याला चांगलं करण्याचे काम करु. पोलिसांची पत आणि प्रतिष्ठा परत मिळवू असा विश्वासही नगराळे यांनी व्यक्त केला.