आजपासून या २१ जिल्ह्यांना दिलासा, निर्बंध होणार कमी, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील परिस्थिती

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हिटी दर हा १० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तिथे आवश्यक आणि अत्यावश्यक सुविधांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र रेड झोनमधील जिल्ह्यांना कुठलीही सवलत मिळणार नसून पूर्वीचेच निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक शमत असल्याचं दिसत असलं तरी राज्यात सर्वत्र समाधानकारक परिस्थिती नसल्यामुळे लॉकडाऊनसदृश निर्बंध सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. मात्र काही जिल्ह्यांना तिथल्या परिस्थितीचा विचार करून निर्बंधांमधून शिथीलता देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आलाय.

    ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हिटी दर हा १० टक्क्यांपेक्षा कमी असेल, तिथे आवश्यक आणि अत्यावश्यक सुविधांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र रेड झोनमधील जिल्ह्यांना कुठलीही सवलत मिळणार नसून पूर्वीचेच निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचप्रमाणे १० टक्क्यांपेक्षा अधिक पॉझिटीव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहतील. मात्र आवश्यक सेवांची दुकाने सुरू ठेवायला परवानगी नसणार आहे.

    २९ मे या दिवशीच्या शेवटी असणारा पॉझिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता यांच्या निकषांवरून जिल्हे निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार २१ जिल्ह्यांमध्ये मॉल सोडून इतर आवश्यक सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

    या जिल्ह्यांना मिळणार दिलासा