मराठी चित्रपट सृष्टीतील ‘या’ कलाकारांनी घेतला राष्ट्रवादीचा झेंडा हाती

मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते.

 

मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, अभिनेते विजय पाटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तसेच  लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर इत्यादींनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राजेश टोपे यांनी या सगळ्यांना पक्षप्रवेशासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.  नामवंतांचा राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलमध्ये प्रवेश केल्याने पक्षाचा सांस्कृतिक विभाग अधिक सशक्त झाला असल्याची प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली.