corona in dharavi

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या(corona patients in mumbai) वाढत असून काही भागात सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. बोरिवली, अंधेरी (प), कांदिवली, मुलुंड या भागात एक हजाराहून अधिक रुग्ण(corona hotspots in mumbai) असून येथील रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे.

  मुंबई : मुंबईत कोरोना रुग्ग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेने कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. बोरीवली, अंधेरी (प), कांदिवली, अंधेरी(पू), मुलुंड या प्रभागात एक हजारपेक्षा अधिक सक्रीय रुग्ण आढळले आहेत. हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असल्याने पालिकेने विशेष लक्ष वेधले आहे.

  गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी एका दिवसांत तब्बल २८७७ रुग्ण आढळले असून आतापर्यंत ही सर्वाधिक नोंद झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढत असून काही भागात सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. बोरिवली, अंधेरी (प), कांदिवली, मुलुंड या भागात एक हजाराहून अधिक रुग्ण असून येथील रुग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे. तर ए विभाग, सी विभाग व सँडहर्स्टरोड येथे सर्वाधिक कमी सक्रीय रुग्ण आहेत.

  डिसेंबर, जानेवारीपर्यंत आटोक्यात आलेल्या कोरोनाने फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबईच्या अनेक भागात कोरोना पसरतो आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे. वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने कठोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा तातडीने शोध घेऊन त्यांची तपासणी केली जाते आहे. गर्दीच्या ठिकाणी नियम धाब्यावर धरणा-यांवर कठोर कारवाई केली जाते आहे.

  रोजच्या चाचण्या ३० ते ३५ हजारापर्यंत केल्या जात आहेत. तसेच रुग्णांमागे १५ क्लोज कॉन्टॅकला क्वारंटाईन करण्यात येत आहे. कोरोना नियंत्रणात आल्याने राज्य सरकारने अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली. सर्वसामान्यांसाठी लोकल, बाजारपेठा, हॉटेल, बार, रेस्टॅारन्ट, नाईटक्लब आदी सार्वजनिक ठिकाणांवरील निर्बंध शिथील केले. मात्र यावेळी मास्क वापरणे व सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे बंधनकारक होते. याकडे लोकांनी दुर्लक्ष केल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

  मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना महिनाभरापासून पुन्हा वाढू लागला आहे. रोजची रुग्णसंख्या २३०० हून अधिक वाढल्याने पालिका सतर्क झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण आढळणाऱ्यांमध्ये ९० टक्क्यांवर रुग्ण हे इमारती आणि उच्चभ्रू वस्तीमधील असल्याचे पालिकेच्या पाहणीत समोर आले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, कार्यक्रम, नाईट क्लब आणि गर्दीची ठिकाणे तसेच कार्यक्रमांमधील गर्दीमुळेच रुग्णवाढ होत असल्याने पालिकेने अशा ठिकाणी कारवाईला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे.

  सध्या मिनी कंटेनमेंट संकल्पनेवर आधारीत उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये प्रतिबंधित क्षेत्रातील सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. क्वारंटाइनचे नियम मोडणार्‍यांची पालिकेकडे तक्रार करणे, स्क्रिनिंग, ऑक्सिजन पातळी मोजणे अशा उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. शिवाय शक्य त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

  या भागात सर्वाधिक सक्रीय रुग्णांची नोंद
  बोरिवली        – ११८०
  अंधेरी (प)    – १८०४
  कांदिवली    – ११३७
  अंधेरी         – ११३८


  मुलुंड          – १२४६