Sanjay Raut

गृहमंत्री अमित शाह यांनी मला विचारले, की आप कौन से स्कूल में पढते हो, त्यावेळी म्युनिसीपालिटी स्कूल नंबर फाईव्ह, पंतनगर असे मी त्यांना सांगितले. या देशाला नवीन शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचे नाव आहे धर्मेंद्र प्रधान. मी त्यांना ओळखत होतो कालपर्यंत ते पेट्रोल विकत होते. ते पेट्रोलियम मंत्री होते.

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात फेरबदल आणि विस्तार करण्यात आला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली. शिक्षणाचा संबंध नसलेल्या लोकांना शिक्षण मंत्री बनवण्यात येते, अशी टीका त्यांनी देशाचे नवे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर केली. विक्रोळी येथील पालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या मुंबई पब्लिक स्कूलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

    काल परवापर्यंत ते पेट्रोल विकायचे

    गृहमंत्री अमित शाह यांनी मला विचारले, की आप कौन से स्कूल में पढते हो, त्यावेळी म्युनिसीपालिटी स्कूल नंबर फाईव्ह, पंतनगर असे मी त्यांना सांगितले. या देशाला नवीन शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचे नाव आहे धर्मेंद्र प्रधान. मी त्यांना ओळखत होतो कालपर्यंत ते पेट्रोल विकत होते. ते पेट्रोलियम मंत्री होते.

    याआधी पोखरीयाल होते ते शाळेतच फार गेले नव्हते, पण ते देशाचे शिक्षण मंत्री होते. आता त्यांना कळाले, की त्यांना काही येत नाही. त्यांच्या आधी स्मृती इराणी मॉडेलिंग करायच्या. म्हणजेच शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोक शिक्षण घडवतात, अशा शब्दांमध्ये राऊत यांनी केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारावर निशाणा साधला.