Fraud

पंतप्रधान कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या विशेष कर्ज योजनांच्या(loan scheme by pmo office) नावाने बनावट अ‍ॅप्लिकेशन तयार करून देशातील शेकडो नागरिकांची फसवणूक(fraud in mumbai) करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना(mumbai police) यश आलं आहे.

    मुंबई: पंतप्रधान कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या विशेष कर्ज योजनांच्या(loan scheme by pmo office) नावाने बनावट अ‍ॅप्लिकेशन तयार करून देशातील शेकडो नागरिकांची फसवणूक(fraud in mumbai) करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना(mumbai police) यश आलं आहे.मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणात ४ जणांना अटक केली आहे.

    आरोपींनी या फसवणुकीसाठी पंतप्रधानांचे छायाचित्र व राजमुद्रा यांचा गैरवापर केला केला आहे. आरोपींनी नागरिकांना जाळ्यात ओढण्यासाठी पेपरात जाहिरात दिल्याचेही समोर आले आहे.

    आरोपींनी योजनेचे सर्व फोटो वापरुन एका अ‍ॅप्लिकेशनवर संपर्क क्रमांक म्हणून कुर्ल्यातील एका तरुणाचा मोबाईल नंबरचा वापरला होता. हा तरुण मेकॅनिकल इंजिनिअर असून त्याला या अ‍ॅप्लिकेशन संदर्भात अनेक व्यक्‍तींचे धमकीचे फोन यायला लागले. भरलेली रक्‍कम परत मागण्यासाठी आलेल्या फोनमुळे त्या तरुणाने कंटाळून मुंबई पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला.

    या टोळक्याने प्रधानमंत्री योजना लोन, पीएम लोन योजना,पीएमवायएल लोन, सर्वोत्तम फायनान्स लोन सर्व्हिस अशा विविध नावाने मोबाईल अ‍ॅप तयार केले होते. ज्यात त्यांनी शासकीय मुद्रेचा आणि पंतप्रधानांच्या फोटोचा वापर केला होता. एका व्यक्तीकडून किमान ९०० ते ३ हजार रुपये घेवून या टोळक्याने ४ हजार जणांची फसवणूक केली.

    या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ४ जणांना अटक केली आहे. यात उत्तर प्रदेशातील एका मोठ्या राजकीय पक्षाचा मोठा पदाधिकारी तथा आमदारकीची निवडणूक लढलेला व्यक्ती देखील आहे. संजीव कुमार सिंह , प्रांजूल राठोड , रामनिवास कुमावत आणि विवेक शर्मा अशी आरोपींची नावे असून या चौघांना अटक करण्यात आली आहे.