या लॉकडाऊनचा पुनर्विचार करा, फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

विकेंड लॉकडाऊन आणि इतर नियमांचं सुरुवातीला स्वागत करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता सरकारला या लॉकडाऊनचा पुनर्विचार करण्याचं आवाहन केलंय. त्यासाठी एक पत्रच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलंय. पुन्हा एकदा समाजातील सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेण्याची गरज असल्याचं मत त्यांनी या पत्रातून मांडलंय. छोटे उद्योजक आणि मध्यमवर्गाला आर्थिक पॅकेज देण्याची गरज असल्याचं मतही फडणवीस यांनी या पत्रातून मांडलंय. 

    महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून ती रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. सुरुवातीला केवळ जमावबंदी आणि संचारबंदीपुरते आहेत, असे वाटणारे हे नियम प्रत्यक्षात मात्र एक प्रकारचं लॉकडाऊनच असल्याची भावना जनसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

    विकेंड लॉकडाऊन आणि इतर नियमांचं सुरुवातीला स्वागत करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता सरकारला या लॉकडाऊनचा पुनर्विचार करण्याचं आवाहन केलंय. त्यासाठी एक पत्रच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलंय. पुन्हा एकदा समाजातील सर्व घटकांशी चर्चा करून निर्णय घेण्याची गरज असल्याचं मत त्यांनी या पत्रातून मांडलंय. छोटे उद्योजक आणि मध्यमवर्गाला आर्थिक पॅकेज देण्याची गरज असल्याचं मतही फडणवीस यांनी या पत्रातून मांडलंय.

    महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ४७,२८८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी २६,२५२ जणांना उपचारांती घरी पाठवण्यात आलंय. तर १५५ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं विकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय़ घेतलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा करूनच हा निर्णय़ घेतल्याचं मविआ सरकारमधील प्रतिनिधींनी म्हटलंय.

    निर्बंध कडक असले, तरी दुकानं सुरू ठेवायची की नाही, याबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. काही ठिकाणी पोलीस दुकानं बळजबरीनं बंद करायला लावत असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी पार्सल सेवेला परवानगी असली, तरी सामान्यांना मात्र पार्सल घेण्यास बंदी करण्यात आलीय. सरकारनं हा घोळ संपवावा आणि स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होते आहे.