७५ टक्क्यांपेक्षा जास्त मार्क मिळूनही ॲडमिशन मिळेना; विद्यार्थ्यांना प्रतिक्षा तिसऱ्या लिस्टची

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीचा निकालामध्ये गुणवतांची संख्या अधिक आहे. त्यातच ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाला पहिल्या गुणवत्ता यादीपासून चुरस पाहायला मिळत आहे. दुसऱ्या यादीनंतर अनेक नामांकित महाविद्यालयांमधील बहुतांश जागा भरल्या आहेत. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना काही कारणास्तव प्रवेश रद्द केल्यास व न घेतल्यास अगदी काही मोजक्या जागांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

    मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत कॉलेजांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर होणार आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीत नामांकित महाविद्यालयांच्या जागा भरल्यामुळे तिसऱ्या यादीत विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता काहीशी धुसर झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र काही विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केल्यास आणि जागा रिक्त राहिल्यास आपल्याला प्रवेश मिळेल या अपेक्षेवर अनेक विद्यार्थी नामांकित महाविद्यालयाच्या तिसऱ्या गुणवत्ता यादीकडे लक्ष लागून रािहले आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीचा निकालामध्ये गुणवतांची संख्या अधिक आहे. त्यातच ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशाला पहिल्या गुणवत्ता यादीपासून चुरस पाहायला मिळत आहे. दुसऱ्या यादीनंतर अनेक नामांकित महाविद्यालयांमधील बहुतांश जागा भरल्या आहेत. दुसऱ्या यादीतील विद्यार्थ्यांना काही कारणास्तव प्रवेश रद्द केल्यास व न घेतल्यास अगदी काही मोजक्या जागांसाठी तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

    यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले नसेल, अशा विद्यार्थ्यांनी सध्या जेथे प्रवेश मिळाला तेथे प्रवेश घेऊन ठेवावा यानंतर तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या दुसऱ्या गुणवत्ता यादीत अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने नामांकित महाविद्यालयांमधील जागा भरल्या आहेत. त्यामुळे तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होण्याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

    यंदा इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी आवश्यक असलेली सीईटी परीक्षा अद्यापही झाली नाहीये. त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी बीएसस्सीसाठी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे जेव्हा सीईटी परीक्षा होऊन त्यांची प्रवेश प्रक्रिया पार पडले त्यावेळी या जागा रिक्त होऊन विद्यार्थ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी निराश न होता काही काळ प्रतीक्षा करावी इंजिनीअरिंग प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी कॉलेज बदलू शकतात असा सल्लाही काही प्राचार्यांकडून देण्यात येत आहे.