कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही या सरकारनं भ्रष्टाचार केला : नारायण राणेंचा गंभीर आरोप

या सरकारने कोरोनाच्या औषधांसाठी काढलेल्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार केला आहे. लसींचं टेंडर का रद्द केलं? राऊतांनी उत्तर द्यावं, असंही ते यावेळी म्हणाले. संजय राऊत प्रत्येक वेळी केंद्रावर, मोदींवर बोट ठेवतात, मग सरकारनं सरळ केंद्रातच विलीन व्हावं असंही ते म्हणाले.

    कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही या सरकारनं भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. आपण लवकरच या सरकारचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंं आहे.

    आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. सध्याचं सरकार हे महाराष्ट्राचं शोषण करणारं सरकार असून त्यांच्या सगळ्या खात्यांमधला भ्रष्टाचार आपण पुराव्यानिशी उघड कऱणार असल्याचा खुलासाही नारायण राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायकीचे नाहीत असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती प्रहार केला आहे.

    या सरकारने कोरोनाच्या औषधांसाठी काढलेल्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार केला आहे. लसींचं टेंडर का रद्द केलं? राऊतांनी उत्तर द्यावं, असंही ते यावेळी म्हणाले. संजय राऊत प्रत्येक वेळी केंद्रावर, मोदींवर बोट ठेवतात, मग सरकारनं सरळ केंद्रातच विलीन व्हावं असंही ते म्हणाले.

    राज्यातल्या कोरोना परिस्थितीबद्दल ते म्हणतात, कोरोना संपवणं यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. उलट कोरोना या सत्ताधाऱ्यांना लाभदायक आहे. त्यांना यानिमित्ताने पैसे खायला मिळाले. त्याचबरोबर सरकारनं लोकांना वाचवण्यासाठी आत्तापर्यंत काहीही केलं नसल्याची कठोर टीकाही त्यांनी केली आहे.