शाळेत या अन्यथा… वेतन कपात

पालिका शिक्षण विभागाचे शिक्षकांना आदेश मुंबई:१५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट करत पालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याना शाळेत हजर राहण्याचे

पालिका शिक्षण विभागाचे शिक्षकांना आदेश

मुंबई: १५ जून पासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असल्याचे स्पष्ट करत पालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याना शाळेत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शाळेत हजर नाही झालात तर विना वेतन रजा होईल त्यास  कार्यालय जबाबदार राहणार नाही असेही पालिकेच्या शिक्षण विभागाने शिक्षकांना एसएमएस पाठवुन कळविले आहे.

जुलैपासून शाळा सुरु होणार असली तरी तयारीसाठी शाळांत सर्व मुख्याध्यापक व वरिष्ठ शिक्षकांना तसेच शिक्षकेत्तर कर्मचार्यांना दररोज शाळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. जे शिक्षक व कर्मचारी शाळेत उपस्थित राहणार नाही त्यांची ऑडीट नोट काढली जाईल व न येणाऱ्या प्रत्येक दिवसाची विनावेतन रजा होईल त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही असेही शिक्षण विभागाने पाठवलेल्या एसएमएस मध्ये म्हटले आहे. 

मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण अधिका-याचे सर्व शिक्षकांना रोज शाळेत हजर रहायला सांगणे ही अतिशय गंभीर बाब आहे.सर्व शिक्षकांनी एकाच दिवशी शाळेत हजर रहाण्याचे आदेश हे कोवीडचा संसर्ग वाढविणारे आहेत. मुंबई बाहेर रहणारे शिक्षकांना शाळेत येण्यासाठी ट्रेन उपलब्ध नाहीत. तसेच २० एप्रिलच्या आदेशानुसार वर्क फ्रोम होम चे पालन करणे बंधनकारक आहे. कॅंटोन्मेंट झोनमधील शाळांसाठी आयुक्त व कलेक्टर निर्णय घेणार आहेत त्यांच्या आदेशाची वाट पाहावी आयुक्तांनी यासंदर्भात शिक्षण विभागाला योग्य ती समज देणे गरजेचे आहे असे शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह  जालिंदर देवराम सरोदे यांनी म्हटले आहे.