हे म्हणजे नानांच्या नाना तऱ्हा; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल

    सोलापूर : नानांच्या नाना तऱ्हा असतात. नाना सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरेच बोलतात आणि संध्याकाळी मागे घेतात. यामुळे त्यांचे वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायचे याचा विचार केला पाहिजे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापूर अकलूज येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

    विरोधी पक्षनेते दरेकर आज सोलापूर अकलूज येथे दौऱ्यावर आहेत. पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नावर दरेकर बोलत होते. नाना कॉँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे त्यांचे म्हणणे काहीसे गांभीर्याने घ्यावे लागेल. त्यांच्या पक्षातच त्यांच्या वक्तव्यावर टीका होते.

    परंतु त्यांनी सांगितलेली भूमिका हे वास्तव आपल्या सगळ्याना मान्य करावे लागेल. २०१४ ला राष्ट्रवादीने त्यांच्याबरोबर युती केली नाही. मग आयत्या वेळेला राष्ट्रवादी त्याना धोका देऊ शकते. म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाबद्दल घेतलेली भूमिका योग्यच आहे, न्याय्यच आहे, असे दरेकर  यांनी सांगितले.