This is the answer given by Yogi Adityanath regarding the discussion of moving Mumbai Film City to Uttar Pradesh

मुंबई : मुंबईची ओळख असलेली फिल्मसिटी (mumbai film city) उत्तर प्रदेशला हलवण्याची चर्चेवरुन चांगलाच वाद रंगला. उत्तर प्रदेशचे (uttar pradesh) मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (yogi adityanath mumbai visit) यासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले. पत्रकार परिषद घेत योगी आदित्यनाथ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

कुणी काही घेऊन जात नाही. मुंबई फिल्मसिटी मुंबईत काम करेल. उत्तर प्रदेशात नव्या फिल्मसिटीच्या उभारणीचं काम सुरू असल्याचे योगींनी स्पष्ट केले. सिनेसृष्टीतील निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकारांच्या भेटीनंतर योगींनी ही घोषणा केली

बॉलिवुड काही पाकिट नाही कुठे घेऊन जायला. ही एक खुली स्पर्धा आहे. सामाजिक सुरक्षा, प्रत्येकाला काम करण्याची संधी, कुणाशीही भेदभाव होणार नाही अशी व्यवस्था निर्माण करायची आहे. या क्षेत्रातल्या दिग्गजांच्या अनुभवांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही कुणाच्याही विकासाच्या आड येत नाही आहोत’, असं देखील योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

आम्ही कुणाकडूनही काही हिसकावून घ्यायला आलेलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी उभारत आहोत. प्रत्येकाला काम करण्यासाठी सुरक्षित आणि चांगली संधी मिळायला हवी. जो ती देऊ शकेल, लोकं तिथे काम करायला जातील आणि उत्तर प्रदेश यासाठी तयार आहे’, असं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

मुंबई फिल्मसिटी उत्तर प्रदेशात नेण्याच्या चर्चेबाबत मुंबईतील शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार टिका केली होती. योगी यांनी आपली भूमिका स्पष्ट करत या नेत्यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.