There is no direct lockdown anywhere in the country; However, these rules will have to be followed till December 31

मुंबई : दिवाळीनंतर मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली होती. मात्र, पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णसंख्येवर नियंत्रण आले आहे. सहा दिवसांपूर्वी १९६ दिवसांवर घसरलेला रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून आता २२२ दिवसांवर पोहचला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून आवश्यक खबरदारी घेतली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, नागरीकांनी देखील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. खबरदारी न घेतल्यास प्रादुर्भाव पून्हा वाढू शकतो.

मुंबईत आटोक्यात आलेला कोरोना दिवाळीनंतर वाढला होता. रोजची साडेचारशे – पाचशे पर्यंत आलेली रुग्णसंख्या दुप्पट झाली होती. मात्र, मागील चार – पाच दिवसांपासून ही संख्या सातशे ते आठशेपर्यंत आली आहे.  त्यामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आली आहे. १५ दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी ३०० च्यावर पोहचला होता. २२ नोव्हेंबरला हा कालावधी घसरून २५८ दिवसांवर आला. तर २६ नोव्हेंबरला  रुग्ण दुपटीचा कालावधी आणखी घसरून १९६ वर आला होता. मात्र सहा दिवसांत म्हणजे २ डिसेंबरपर्यंत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढला असून २२२ दिवसांवर पोहचला असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

बरे होणा-या रुग्णांचा दर ९१ टक्के आहे. कोरोना रोखण्यासाठी पालिकेने विविध उपाययोजना राबवत आहेत. पुरेसा बेड, कोरोना सेंटर, चाचण्या, उपचार पद्धती आदी प्रभावीपणे राबवली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.