मुंबईच्या लोकलचा स्पीड कमी होण्याचे ‘हे’ आहे धक्कादायक कारण

मध्य रेल्वे मार्गावरील विष्ठेमुळे रेल्वे रुळाचं आयुष्य कमी होतय. देखभाल खर्च वाढतोय. पण त्याचबरोबर अनेक लोकल्सच्या वेगावरही परिणाम होतोय. मध्य रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी लोकल्सचा वेग कमी करावा लागतोय.

    मुंबईच्या लोकल स्पीड कमी व्हायचे धक्कादायक कारण समोर आले आहे. लोकल स्पीड स्लो व्हायला हागणदरी कारणीभूत आहे. मुंबई महापालिकेने चार वर्षांपूर्वी मुंबई हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात असं झालेलं नाही. त्याचा फटका मध्य रेल्वेला बसतोय. मध्य रेल्वे मार्गावरील विष्ठेमुळे रेल्वे रुळाचं आयुष्य कमी होतय. देखभाल खर्च वाढतोय. पण त्याचबरोबर अनेक लोकल्सच्या वेगावरही परिणाम होतोय. मध्य रेल्वे मार्गावर अनेक ठिकाणी लोकल्सचा वेग कमी करावा लागतोय.

    काही पट्ट्यांमध्ये ट्रेन्सचा ताशी वेग १०० किमी आहे. पण काही पट्ट्यांमध्ये ट्रेन्स ताशी ३० किमी पेक्षा जास्त वेगाने पळवता येत नाहीत. काही ठिकाणी रेल्वे रुळ गंजल्यामुळे धोकादायक बनले आहेत. हे रुळ गंजण्याचं कारण मलमूत्र आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. मानवी विष्ठेमुळे रेल्वे कामगारांना रुळावर काम करताना अडचणीच येतातच, पण त्याचबरोबर रुळाचे आयुष्य ५० टक्क्याने कमी होते, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

    लोकांनी रेल्वे रुळावर प्रांतविधी उरकु नयेत, यासाठी आम्ही वेगवेगळे मार्ग अवलंबत असतो. झोपडपट्टीजवळ जे रुळ आहेत, तिथे आरपीएफचे जवान तैनात केले जातात. दंड आकारला जातो, नोटीस दिली जाते. पण अजूनही समस्या सुटलेली नाही असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. झोपडपट्टीत राहणीमानाचा दर्जा सुधारावा, यासाठी रेल्वेचे अधिकारी महापालिकेच्या संपर्कात असतात.