प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

काही दिवसांपूर्वी जनरल मोटर्सने जगभरातील सुमारे 69 हजार शेवरलेट बोल्ट इलेक्ट्रिक कारला परत मागवतल्या होत्या. ही वाहने परत मागवण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये वाहनांमध्ये असलेल्या बॅटरीला आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. आता अशातच दुचाकी आणि चारचाकी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणार्‍या होंडा कंपनीने आपल्या अनेक गाड्या परत मागवल्या आहेत.

मुंबई (Mumbai).  काही दिवसांपूर्वी जनरल मोटर्सने जगभरातील सुमारे 69 हजार शेवरलेट बोल्ट इलेक्ट्रिक कारला परत मागवतल्या होत्या. ही वाहने परत मागवण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये वाहनांमध्ये असलेल्या बॅटरीला आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. आता अशातच दुचाकी आणि चारचाकी क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणार्‍या होंडा कंपनीने आपल्या अनेक गाड्या परत मागवल्या आहेत.

विशेष बाब म्हणजे एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येत गाड्या परत मागविण्याची ही पहिलीच वेळ असावी. आणि यात 2-3 प्रकारच्या गाड्या विविध कारणांमुळे परत मागवल्या आहेत. Honda Motor Company ला सेफ्टी संबंधीत काही त्रूटी दिसल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीने 1.79 मिलियन व्हेईकल्स परत मागवल्या आहेत.

एका रिकॉलमध्ये 26800 युनिटस 2002-2006 होंडा सीआरव्ही समावेश आहे. या कारमध्ये विंडो मास्टर स्विच मध्ये त्रूटी निघाली आहे. कंपनीने सांगितले की, या संबंधित आतापर्यंत कोणीही इंजरीची रिपोर्ट करण्यात आली नाही. परंतु, आगीशी संबंधित १६ रिपोर्ट्स समोर आली आहे, अशी माहिती होंडा कंपनीकडून मिळाली आहे. Accord Hybrid, होंडा सिविक हाइब्रिड, Honda Fit, Honda Acura ILX ची युनिट्स सुद्धा रिकॉल करण्यात आली आहे.