‘त्या’ पोलिस अधिकाऱ्यांची शहराबाहेर बदली होणार पण त्यांच्या….

राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील सर्व पोलिस आयुक्तालयांना 8 वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच शहरात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची यादी बनविण्याचे आदेश दिले आहे.

    मुंबई : अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर मुंबईसह संपूर्ण राज्यातील पोलिस दलात फेरबदल केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता 8 वर्षांपेक्षा जास्त काळापासून एकाच शहरात कार्यरत असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक (सिनीअर पीआय), पोलिस निरीक्षक (पीआय), सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) आणि पोलिस उपिनरीक्षकांची (पीएसआय) शहराबाहेर बदली केली जाणार आहे.

    राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील सर्व पोलिस आयुक्तालयांना 8 वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच शहरात कार्यरत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांची यादी बनविण्याचे आदेश दिले आहे.

    या सर्व पोलिस अधिकाऱ्यांची शहराबाहेर बदली केली जाईल. त्यांना बदलीसाठी पसंतीचे तीन जिल्हे निवडण्याची सवलत देण्यात आली आहे. यात त्यांच्या गृहजिल्ह्याचाही समवोश करता येणार आहे. निलंबित एपीआय सचिन वाझेचे कारनामे उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र पोलिस दलात मोठे फेरबदल केले जात आहे.