मास्क न वापरणाऱ्यांना होणार २०० रुपयांचा दंड

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच मास्क वापर न करणाऱ्यांवर १००० रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले होते.

मुंबई : कोरोना संसर्गाचा (Corona Virus) प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने मास्क (mask) वापर न करणाऱ्यांविरुद्ध सुरु केलेली दंडात्मक कारवाई भ्रष्टचाराचे कारण बनायला नको म्हणून दंडाची रक्कम १००० रुपयांवरुन २०० रुपये करण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. या नवीन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिला आहे.

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे. तसेच मास्क वापर न करणाऱ्यांवर १००० रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार ९ एप्रिलपासून मुंबईत दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली. दंडाची रक्कम आधिक असल्यामुळे नागरिकांकडून पालिकेवर टीका होत आहे. दंडाची रक्कम अधिक असल्यामुळे थोडीफार रक्कम देऊन सुटका करुन घेण्याची शक्यता वाढू लागली होती.