कोरोना लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्यांना ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ची दाहकता व परिणाम कमी- डाॅ. संजय ओक, टास्क फाेर्स प्रमुख

  मुंबई (Mumbai) : राज्यात (the state government) दिवसें दिवस काेराेनाच्या डेल्टा प्लस व्हेरीएंटचे (Delta Plus variant)  रुग्ण वाढत आहेत. आता त्या रुग्ण संख्येत वाढ झाली असून सध्या ही रुग्णसंख्या ७६ वर पाेहचली आहे. मात्र राज्य सरकार व आराेग्य विभाग (the health department) आयसीएमआरने (ICMR) दिलेल्या  प्राेटाेकाॅलनुसार (the protocol) सर्व काळजी घेत असून सर्व डेल्टा प्लस व्हेरीएंटच्या  काेराेना रुग्णांंना आयसाेलेट करुन त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती आराेग्य विभागाकडून देण्यात आली. (The number of Delta Plus variant patient in Maharashtra)

  या डेल्टा व्हेरीएंटची बाधा झालेल्या काेराेना रुग्णांच्या संपर्कातील नागिरकांचा शाेध घेऊन त्यांच सुध्दा अलगीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेच लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्या नागरिकांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची दाहकता व परिणाम नक्कीच कमी असेल, असे  टास्क फाेर्सचे प्रमुख डाॅ. संजय ओक यांनी सांगितले.

  डेल्टा प्लस व्हेरीएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अलीकडेच राज्यात १० रुग्ण वाढले आहेत. यात मुंबईत सध्या ११ रुग्ण आहेत. तर जळगाव-१३, रत्नागरी -१५, काेल्हापूर-७, ठाणे,पुणे- प्रत्येकी ६, नांदेड, गाेंदिया,  सिधुदुर्ग-२, पालघर, रायगड- प्रत्येकी ३, चंद्रपूर, अकाेला, सांगली, नंदूरबार, औ रंगाबाद, बीड प्रत्येकी -१ अशी राज्याची सद्य स्थिती आहे. डेल्टा प्लस व्हेरीएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी सांगतात.

  डेल्टा प्लस रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा शाेध घेतला जात आहे शिवाय त्यांचे अलगीकरण केले जात असल्याची माहिती आराेग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  दिली. घाबरुन न जाता त्वरीत डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, उपचार सुरु करावेत असे आवाहन आराेग्य  विभागाने केले आहे.

  लसीचे दाेन्ही डाेस घेतलेल्यांना डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धाेका कमी – डाॅ. संजय ओक
  दाेन डाेस घेतलेल्या नागरिकांना डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे हे सत्य आहे.  जी लस आहे, ती प्री डेल्टा म्हणजे डेल्टा  निर्माण हाेण्याच्या आधीच्या काळात  निर्माण झाली आहे. जसे  विषाणूमध्ये उत्क्रांती हाेते. तशीच लसीमध्येही फरक हाेत राहताे. त्यामुळे दाेन डाेस घेतलेल्यांना डेल्टा प्लस हाेणार नाही असे नाही, पण त्याची दाहकता व त्याचे परिणाम नक्कीच कमी असेल.