महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान करणाऱ्यांनो सूडबुद्धीने राजकारण करू नका, शिवसेनाची जहरी टीका

वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, ही अपेक्षा. केंद्र सरकारने या सर्व गोष्टी सूड भावनेने केल्या आहेत अशी जहरी टीकाही करण्यात आली आहे. फक्त एकाच व्यक्तीला लक्ष्य करून त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना धारेवर धरायचं हा कुठला न्याय?

  मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्यानंतर एकच गदारोळ झाला. या प्रकरणावर अजूनही तर्क-वितर्क सुरूच आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना काल अटक करण्यात आली. यावरून आजच्या सामनाच्या अग्रलेखात विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. महाराष्ट्राच्या पोलीस क्षमता व शौर्य याची वाहवा जगभरात असताना २० जिलेटिनच्या कांड्यांसाठी केंद्रीय तपास पथकाने मुंबईत यावे, हे आश्चर्यच आहे असा घणाघाती प्रहारही या अग्रलेखातून करण्यात आलेला आहे.

  सचिन वाझे यांचे काही चुकलेच असेल व २० जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे.

  हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, ही अपेक्षा. केंद्र सरकारने या सर्व गोष्टी सूड भावनेने केल्या आहेत अशी जहरी टीकाही करण्यात आली आहे. फक्त एकाच व्यक्तीला लक्ष्य करून त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना धारेवर धरायचं हा कुठला न्याय?

  महाराष्ट्र पोलीस दलाने आजवर अनेक प्रकरणांचा तपास योग्यरितीने करून ती प्रकरणे धसास लावली आहेत मग एवढं सगळं असताना त्यांच्यावर अविश्वास असण्याचं कारण काय? महाराष्ट्र पोलीस दल या प्रकरणाचाही आपल्या परीने योग्य दिशेनेच तपास करत आहे पण सूडबुद्धीने राजकारण करून त्यांना त्यांचं कामच करून द्यायचं नाही हा विरोधकांचा डाव असल्याचं मतही या आजच्या लेखातून व्यक्त करण्यात आलं आहे.

  महाराष्ट्रात काही खुट्ट झाले की, या केंद्रीय यंत्रणा लगेच महाराष्ट्रात धाव घेतात. अलीकडे हे जणू केंद्र सरकारचे धोरणच झालेले दिसते. अंबानी हे आपल्या देशातील बडे प्रस्थ आहेत. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही खोट असता कामाच नये. म्हणूनच त्यांच्या घराच्या परिसरात सापडलेल्या 20 जिलेटिनच्या कांड्या व त्यानंतर झालेला मनसुख हिरेनचा मृत्यू हे दोन्ही प्रकार गंभीरच आहेत, पण म्हणून या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना जमणार नाही हे केंद्र सरकार परस्पर कसे काय ठरवू शकते?

  वाझे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भंपक गोस्वामीला पकडले, त्याचा टीआरपी घोटाळा उघड केला. त्या बदल्यात केंद्राने वाझे यांना पकडून दाखवले. इथेच ही केस फाईल बंद होते. वाझे यांचे काही चुकलेच असेल व २० जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडवले जात आहे. असं सूडबुद्धीचे राजकारण करणं थांबवा असा थेट इशाराच या लेखातून विरोधकांना देण्यात आला आहे.