तुमचा भुजबळ करू अश्या धमक्या देणाऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयातून योग्य उत्तर मिळालं : छगन भुजबळ

तुमचा भुजबळ करू अश्याही धमक्या विरोधक अन्य लोकांना देवू लागले होते त्या साऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयातून योग्य उत्तर मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली.

    मुंबई : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात झालेल्या आरोपातून त्यांना दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. या निर्णयानंतर माध्यमांना माहिती देताना छगन भुजबळ यांनी आपल्यावरील खोटे नाटे आरोप झाले होते. त्यावर मीडिया ट्रायल करण्यात आली आणि त्रास देण्यात आल्याचे सांगितले. तुमचा भुजबळ करू अश्याही धमक्या विरोधक अन्य लोकांना देवू लागले होते त्या साऱ्यांना न्यायालयाच्या निर्णयातून योग्य उत्तर मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यानी दिली.

    एका पैशाचाही घोटाळा झाला नाही

    ते म्हणाले की या सगळ्यातून सव्वा दोन वर्षापेक्षा अधिक काळ तुरुंगात राहावे लागले. आणि तुमचा भुजबळ करू अश्याही धमक्या विरोधक अन्य लोकांना देवू लागले होते त्या सा-यांना न्यायालयाच्या निर्णयातून योग्य उत्तर मिळाले आहे असे ते म्हणाले. भुजबळ म्हणाले की, या प्रकरणात एका पैशाचाही घोटाळा झाला नाही हे आम्ही वारंवार सांगत होतो. तेच आम्ही न्यायालयात सांगितले. त्यामुळेच आमच्याकडील पुरावे आणि सरकारी यंत्रणांच्या तपासाच्या माहितीची शहानिशा करत आम्हाला त्या निर्दोष मुक्त केले आहे, असे भुजबळ म्हणाले.

    विकासकाना काहीच फायदा झाला नाही

    या निर्णयानंतर ज्यांनी आपल्याला त्रास दिला, त्यांच्या बद्दल काहीच बोलायचे नाही केवळ सत्य परेशान हो सकता है पराजीत नही इतकेच म्हणायचे आणि पुढे जायचे आहे असे ते म्हणाले. भुजबळ म्हणाले की, या सा-या निर्णयानंतर सर्वात प्रथम शरद पवार साहेबांना भेटून त्यांचे आभार मानले आता मला मागच्या कोणत्याच गोष्टींवर काही बोलायचे नाही असे ते म्हणाले. न्याय मिळाल्याने दिलासा मिळाल्याचा आनंद आहे त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करतो असे ते म्हणाले. महाराष्ट्र सदनाचे काम छान झाले आहे, मात्र त्यांच्या विकासकाना काहीच फायदा झाला नाही एक इंच जागा किंवा पैसा मिळाला नाही तरीही आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले ते योग्य नव्हते असे ते म्हणाले.