कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास परवानगी द्यावी; प्रवाशांची मागणी

केवळ अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनाच रेल्वेने प्रवासाची मुभा आहे. यामुळे रेल्वे प्रवासावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे हाल अद्यापही कायम आहेत; परंतु लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.

    मुंबई :राज्यात कोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात ओसरल्याने अनलॉकची प्रक्रिया सोमवारपासून (दि. ७ जून)आता सुरू झाली आहे. राज्यातील कोरोनाग्रसंतांच्या संख्येनुसार पाच स्तर केले असून त्यानुसार निर्बंध लावण्यात आले आहेत, मुंबईमध्येही कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. येथेही निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र असे असले तरीही लोकल प्रवासावरील निर्बंध अद्यापही कायम आहेत. यामुळे नोकरदारांना तसेच व्यापाऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. हे लक्षात घेता ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत, अशांना रेल्वेने प्रवासाची परवानगी द्यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

    केवळ अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनाच रेल्वेने प्रवासाची मुभा आहे. यामुळे रेल्वे प्रवासावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे हाल अद्यापही कायम आहेत; परंतु लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.याबाबत रेल्वे प्रशासनाचे म्हणणे असे आहे की, शासनाच्या विनंतीनुसारच रेल्वे सुरू करण्यात आली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली आहे. अशा प्रवाशांना रेल्वे प्रवास करून दिला जात आहे. दोन डोस पूर्ण केलेल्या प्रवाशांना शासनाने प्रवासाची परवानगी दिल्यास रेल्वे प्रवाशांना प्रवास करू दिला जाईल.