Dhananjay Munde

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात राजीनाम्याच्या मागणीला अर्धविराम मिळाल्याचे दिसत असतानाच दुसरीकडे त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ता हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.

मुंबई (Mumbai).  राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात राजीनाम्याच्या मागणीला अर्धविराम मिळाल्याचे दिसत असतानाच दुसरीकडे त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत याचिका दाखल करण्यात आली आहे. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ता हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.

लैंगिक अत्याचाराच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा होता होता राहिला त्यामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. मात्र त्यांच्या समोरच्या कायदेशीर अडचणी मात्र संपल्याचे दिसत नाही. धनंजय मुंडे यांनी समाजापासून आपल्याला आणखी दोन मुले असल्याची माहिती दडवून ठेवली. निवडणुकीपूर्वी आयोगाकडे प्रतिज्ञापत्र दाखल करताना त्याबाबत खोटी माहिती दिली, असा आरोप करत धनंजय मुंडे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या. अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ता आणि राष्ट्रीय भ्रष्ट्राचार विरोधी जनशक्ति संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.