भेसळयुक्त पेट्रोल पंपचे हाती लागले धागेदोरे ; मुंबई क्राईम ब्रांचच्या धडक कारवाईनंतर अधिकारीही झाले हैराण

मुंबई क्राईम ब्रांचचे (Mumbai Crime Branch) संजय निकुंभ यांना याबाबत माहिती मिळाली. आणि त्यांनी पेट्रोल पंपावर ( petrol pump ) धाड टाकली. पोलिसांसमोर (Police) जे चित्र होतं ते सर्वांनाच चक्रावून टाकणारं होतं. एका भल्या मोठ्या डिझेल टाकीत हजारो लीटर डिझेल चोरुन विकत असल्याचे येथे पोलिसांना आढळलं.

मुंबई: एखाद्या पेट्रोलपंपावर ( petrol pump ) भेसळयुक्त पेट्रोल किंवा डिझेल (Petrol or diesel)  विकलं जातं हे आपण ऐकलं असेल… फार फार तर आपण कधी भेसळयुक्त डिझेल-पेट्रोलचे बळी पडला असाल. पण संपूर्ण डिझेल पंपच भेसळयुक्त असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मुंबई क्राईम ब्रांचचे (Mumbai Crime Branch) संजय निकुंभ यांना याबाबत माहिती मिळाली. आणि त्यांनी पेट्रोल पंपावर धाड टाकली. पोलिसांसमोर जे चित्र होतं ते सर्वांनाच चक्रावून टाकणारं होतं. एका भल्या मोठ्या डिझेल टाकीत हजारो लीटर डिझेल चोरुन विकत असल्याचे येथे पोलिसांना आढळलं. एवढच नाही तर विकत असलेले डिझेल देखील भेसळयुक्त होते. म्हणजे हा कोणता अधिकृत डिझेल पंप नसून अनधिकृत म्हणजे भेसळयुक्त डिझेल पंप ( diesel pump )असल्याचे यावेळी समोर आले.

या पंपावर भेसळयुक्त डिझेल विकले जात होते. तरलोक सिंह हरीसिंह तलवार या व्यक्तीला या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. तरलोक हा मोठा डिझेल माफिया असल्याचे बोलले जात आहे. या अनधिकृत डिझेल पंपाच्या माध्यमातून लोकांनी लाखो लीटर डिझेल विकले आहे.