मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी, महापौरांना सत्य बाहेर येण्याची खात्री

३१ डिसेंबर २०२० या दिवशी आझाद मैदान पोलीस ठाण्यात या प्रकरणी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हादेखील दाखल करण्यात आलाय. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्यानं भाजपवर हल्लाबोल करत आहेत. ईडीकडून शिवसेना नेत्यांना आलेल्या नोटीसींवरून अनेकदा भाजपवर जाहीर टीका केलीय. मात्र सत्य निश्चितपणे बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलीय.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिल्याची माहिती आहे.

महापौर पेडणेकर यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्या व्यक्तीनं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय अश्लील भाषेत त्यांना शिविगाळदेखील केली. २२ डिसेंबरला कार्यलयात असतानाच हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय.

३१ डिसेंबर २०२० या दिवशी आझाद मैदान पोलीस ठाण्यात या प्रकरणी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हादेखील दाखल करण्यात आलाय. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपण सातत्यानं भाजपवर हल्लाबोल करत आहेत. ईडीकडून शिवसेना नेत्यांना आलेल्या नोटीसींवरून अनेकदा भाजपवर जाहीर टीका केलीय. मात्र सत्य निश्चितपणे बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलीय.

शिवसेना आणि भाजपमधील संबंध ताणले गेले असताना महापौरांनी या प्रकरणी राजकीय प्रतिक्रिया दिल्यामुळे वातावरणातील तणाव अधिकच वाढण्याची शक्यता आहे.