सलग तीन दिवस तीन अंक रुग्णसंख्या; २४ तासांत ९२५ नवे रुग्ण

मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईचा रिकव्हरी रेटही ९५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत गेल्या २ ते ३ दिवसांपासून बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. मुंबईत बुधवारी ९२५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेली बाधितांची संख्या ७ लाख ८ हजार ७ इतकी झाली आहे.

  मुंबई : मुंबईतील रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुंबईचा रिकव्हरी रेटही ९५ टक्क्यांवर आला आहे. मुंबईत गेल्या २ ते ३ दिवसांपासून बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी तीन अंकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. मुंबईत बुधवारी ९२५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेली बाधितांची संख्या ७ लाख ८ हजार ७ इतकी झाली आहे.

  मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मुंबईच्या रुग्णसंख्येत काही अंशी वाढ झाली आहे. मुंबईत काल पर्यंत मृतांचा आकडा कमी झाला होता. आज मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. मुंबईत बुधवारी ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत नोंद करण्यात आलेल्या मृत्यूंची संख्या ही १४ हजार ९३८ इतकी झाली आहे.

  कालपर्यंत मुंबईत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ५ हजारांवर होती. बुधवारी मात्र कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत १ हजार ६३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवरी हीच संख्या ५ हजार ८६८ इतकी होती. कोरोनामुक्तांच्या संख्येत ४ हजारांनी घट झाली. मुंबई एकीकडे कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असली तरी मुंबईच्या आकडेवारीत होणारा चढ उतार मुंबईकरांसाठी धोकादायक ठरु शकतो. मुंबईत आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ लाख ७४ हजार २९६ इतकी झाली आहे.

  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा