लालबाग सिलिंडर स्फोट:मसीना रुग्णालयातील चार जणांची प्रकृती चिंताजनक, तिघांचा मृत्यू

रविवारी लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलिंडर स्फोट(gas cylinder blast) दुर्घटनेतील तीन जणांचा शुक्रवारी सकाळच्या सुमारास मृत्यू(three dead in gas cylinder blast) झाला. हे तिघेही केईएम रुग्णालयात दाखल होते.

मुंबई: रविवारी लालबाग परिसरातील साराभाई इमारत गॅस सिलिंडर स्फोट(gas cylinder blast) दुर्घटनेतील तीन जणांचा शुक्रवारी सकाळच्या सुमारास मृत्यू(three dead in gas cylinder blast) झाला. हे तिघेही केईएम रुग्णालयात दाखल होते. यात मंगेशकर राणे, ज्ञानदेव सावंत आणि महेश मुंगे,अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.

दरम्यान, या स्फोट दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच भायखळा येथील मसिना रुग्णालयता दाखल असलेले चार जणांची प्रकृती आता स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. केईएम रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडर स्फोटातील जखमींपैकी मंगेशकर राणे यांचा सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मृत्यू झाला. तर ज्ञानदेव सावंत यांचा सकाळी ९.२५ वाजता तर महेश मुंगे यांचा दुपारी दिडच्या सुमारास मृत्यू झाला. सध्या तीन जणांवर उपचार सुरु आहे. तर मसीना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चारही जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.