मुंबईत सध्या तीन हजार युनिट रक्तसाठा उपलब्ध; दरराेज ५०० ते ८०० यूनिटची गरज

मागील काही दिवसांपांसून मुंबईसह राज्यात काेविड रुग्णसंख्येत (Covid patients) चढ-उतार दिसून येत आहे. कोरोना काळात कमी रक्तसंकलन (blood circulation) हाेत असल्याच्या तक्रारी हाेत आहेत. दुसरीकडे, अजुनही शाळा, काॅलेज बंद असून बरीच खासगी कार्यालये, बड्या काॅर्पाेरेट कंपन्या वर्कफाॅर्म हाेम सुरु आहेत.

  मुंबई (Mumbai). मागील काही दिवसांपांसून मुंबईसह राज्यात काेविड रुग्णसंख्येत (Covid patients) चढ-उतार दिसून येत आहे. कोरोना काळात कमी रक्तसंकलन (blood circulation) हाेत असल्याच्या तक्रारी हाेत आहेत. दुसरीकडे, अजुनही शाळा, काॅलेज बंद असून बरीच खासगी कार्यालये, बड्या काॅर्पाेरेट कंपन्या वर्कफाॅर्म हाेम सुरु आहेत. ज्यामुळे मुंबई शहर व उपनगरात सध्या रक्तदान शिबिर माेजक्याच ठिकाणी हाेत आहे. परिणामी, मुंबईसह राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे म्हणणे आहे.

  यामुळे,रक्तदान करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे, शिवाय रक्ताच्या संभाव्य तुटवड्यावर मात करण्यासाठी परिषद विविध उपाययाेजना आखत असून राज्यातील सर्व खासगी रक्तपेढ्यांनाही आदेश देण्यात आले आहेत. तसेच रक्तपेढ्यांनी स्वैच्छिक
  रक्तदान शिबिरांचे आयाेजन करावेत असे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेने दिले आहेत.

  राज्य रक्त संक्रमण परिषदेचे काय आहेत आदेश?
  रक्ताच्या संभाव्य तुटवड्यावर मात करण्याकरीता सर्व रक्तपेढ्यांना सांगण्यात आले आहे की, त्यांनी सामाजिक, राजकीय, धार्मिक संस्थांना संपर्क करुन सामजिक अंतर व इतर नियमांचे पालन करुन लहान लहान प्रमाणात आपापल्या परिसरात स्वैच्छिक रक्तदान शिबीरे आयाेजित करावेत. याशिवाय राज्य रक्तसंक्रमण परिषदेकडून धार्मिक संस्थांनादेखील रक्तदान शिबीरांबाबत सांगण्यात येत आहे.

  याशिवाय गृहनिर्माण माेठया साेसायटी, छाेट्या-छाेट्या साेसायटी वजा बैठ्या चाळी यांचाही रक्तदान शिबीरात समावेश करुन घ्यावा. याशिवाय येथे रक्तसंकलन वाहन पाठवून रक्त संकलन करण्यावर भर देण्यात यावा, तर राज्यात रक्ताचा तुटवडा भासणार नाही याची खबरदारी सर्व रक्तपेढ्यांनी घ्यावी असे आदेश राज्य रक्त संक्रमण परिषदेकडुन देण्यात आले आहेत. १४ जून २०२१ राेजी रक्तदानाबाबत जाहीरातीच्या माध्यमातून आवाहनही करण्यात आले हाेते.

  सध्या मुंबईत ‌तीन हजार युनिट रक्तसाठा उपलब्ध
  सध्या मुंबईत तीन हजार युनिट रक्तसाठा असून हा रक्तसाठा कमी आहे. संभाव्य रक्त तुटवड्याकरीता राज्यातील सर्व खासगी रक्तपेढ्यांनी रक्तदान शिबिरे घेण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. रक्ततुटवडा भासणार नाही याची खबरदारी घेण्याबाबत सांगण्यात आले आहे. विविध माध्यमातून रक्तदानाबाबत मुंबईकरांना आवाहन केले जात आहे. मुंबईकरांनी पुढे यावे आणि रक्तदान करावे.
  —– डाॅ. अरुण थाेरात (सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद)