vaccine corona virus

मुंबईत कोरोना लसीच्या (Corona Vaccine) चाचणीला आज शनिवार पासून सुरूवात होणार आहे. तसेच ही लस तीन स्वयंसेवकांना दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) कोरोनावरील ऑक्सफर्ड (Oxford) लशीच्या वैद्यकीय चाचण्यांना वेग आला आहे.

 मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Virus) मोठ्या संख्येने होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसींची निर्मिती केली जात आहे. मुंबईत कोरोना लसीच्या (Corona Vaccine) चाचणीला आज शनिवार पासून सुरूवात होणार आहे. तसेच ही लस तीन स्वयंसेवकांना दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. केईएम रुग्णालयातील (KEM Hospital) कोरोनावरील ऑक्सफर्ड (Oxford) लशीच्या वैद्यकीय चाचण्यांना वेग आला आहे.

लस देण्यासाठी आतापर्यंत १३ जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने केल्या जाणाऱ्या कोविडशील्ड या लशीच्या वैद्यकीय चाचण्या मुंबईत होणार आहेत. तसेच शनिवारी तीन लोकांवर लसीचे परीक्षण केले जाणार आहे, असं रुग्णालयाचे अधिष्ठाता हेमंत देशमुख (Hemant Deshmukh)  यांनी सांगितले.

पुण्याच्या सीरम इंस्टिट्यूटने ब्रिटिश स्वीडिश फार्मा कंपनी Astra Zeneca सोबत कोव्हिड-१९ लस तयार करण्यासाठी भागीदारी केली आहे. ही लस ऑक्सफोर्ड यूनिव्हिर्सिटीमध्ये तयार केली आहे. केईएम हे पहिले रुग्णालय आहे. जिथे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाद्वारे निर्मित मानवी परीक्षण केले जाणार आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीद्वारे कोविड शील्ड लस विकसित केली आहे आणि भारतातील पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट तयार करत आहे.