Thrill of suicide at the gate of the Ministry! Death of a person who administers a poisonous drug

मागील सहा महिन्यापासून जाधववाडी गावातील शिंदे कुटुंबासोबत सुभाष जाधव यांचा शेतजमिनीवरुन वाद सुरु होता. या वादातुन चार वेळा हाणामारी, शिवगाळ, भांडणे झाली असुन याबाबत मंचर पोलीसांत शिंदे यांच्यावर तीन तर जाधव यांच्यावर दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

    मुंबई : काही दिवसांपूर्वी मंत्रालयाच्या गेटवर सुभाष सोपान जाधव ५४ या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सुभाष यांच्यावर जीटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा आज मृत्यू झाला आहे. सुभाष जाधव हे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी गावातील रहिवाशी आहेत.

    मागील सहा महिन्यापासून जाधववाडी गावातील शिंदे कुटुंबासोबत सुभाष जाधव यांचा शेतजमिनीवरुन वाद सुरु होता. या वादातुन चार वेळा हाणामारी, शिवगाळ, भांडणे झाली असुन याबाबत मंचर पोलीसांत शिंदे यांच्यावर तीन तर जाधव यांच्यावर दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

    मात्र, अशातच आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना मनात घेऊन सुभाष जाधव मंत्रालयात पोहचले मात्र मंत्रालयाच्या गेटमधुन प्रवेश दिला नसल्याने त्यानी विषारी औषध प्रशान करुन आत्महत्या केली.